आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री प्रियांका चोप्राचे 'अनफिनिश्ड' हे आत्मचरित्र लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तिने खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केली आहे. या पुस्तकातील एक संदर्भ प्रियांकाने अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा किस्सा 2019च्या कान्स सोहळ्यातील आहे.
पती निक जोनाससोबत पोहोचली होती पीसी
प्रियांकाने सांगितल्याप्रमाणे तिने 2019 मध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर रॉबर्टो कावेलीचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. रेड कार्पेट वॉकसाठी येण्याच्या काही क्षणांपूर्वीच प्रियांकाच्या या ड्रेसची चेन तुटली होती. याबाबत लिहिताना देसी गर्ल प्रियांका म्हणते, 'मी बाहेरून कितीही शांत आणि निवांत दिसत असले तरीही त्यावेळी मी प्रचंड घाबरले होते.'
तिने पुढे लिहिले, '@roberto_cavalli च्या या विंटेज ड्रेसला असणारी नाजुक चेन रेड कार्पेटवर जाण्याच्या काही क्षण आधीच तुटली. आता यावर उपाय काय? त्याचवेळी माझ्या टीमला एक उपाय सुचला. त्यांनी वाटेतच अवघ्या पाच मिनिटांच्या वाटेदरम्यानच माझ्या ड्रेसला शिवण घातले आणि परिस्थिती निभावून नेली.' अशाप्रकारे प्रियांका आपल्या टीममुळे वार्डरोब मालफंक्शनला सामोरे जाण्यापासून वाचली.
पीसीने सांगितल्यानुसार, असाच एक किस्सा मटा गाला इव्हेंटदरम्यानही घडला होता, पण त्याची पुस्तकाची वाट बघावी लागेल, असे तिने सांगितले आहे.
यंदा मे महिन्याऐवजी जुलैत होणार कान्स सोहळा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कान्स फिल्म्स फेस्टिव्हल सोहळा लांबणीवर टाकण्यात आला आहे. हा सोहळा यापूर्वी 11 मे ते 22 मे दरम्यान होणार होता. मात्र फ्रान्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने तिथे लॉकडाउन जाहिर झाला आहे. त्यामुळे हा सोहळा आता 6 जुलै ते 17 जुलै दरम्यान होणार आहे. इतकेच नाही तर जुलै महिन्यात जर कान्स सोहळा होऊ शकला नाही तर बॅकअप म्हणून ऑगस्टच्या तारखाही ठेवण्यात आल्या आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.