आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाविषयी प्रियंकाचे वक्तव्य:​​​​​​​प्रियंका मुलाखतीत म्हणाली - '20 वर्षांची असताना लग्नाविषयी अवघड वाटत होते, हा विचार मला विचित्र वाटायचा'

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रियंका चोप्राने 1 डिसेंबर 2018 मध्ये इंटरनॅशनल सिंगर निक जोनाससोबत लग्न केले होते.

प्रियंका चोप्रा म्हणाली की, ती जेव्हा 20 वर्षांची होती तेव्हा तिला लग्नाविषयी सहज वाटत नव्हते. या विचारांनीच ती घाबरुन जायची. पण आता ती याविषयी एकदम कम्फरर्टेबल आहे. प्रियंका एका इंग्रजी मॅगझीनसोबत बातचित करत होती की, निक जोनास भेटल्यानंतर लग्नाविषयीचा तिचा दृष्टीकोण बदलला. ती म्हणाली की, 'दिर्घकाळ असे वाटत होते की, मला काहीच माहिती नाही. विवाहित असणए एक विचित्र विचार वाटत होता'

'नवी बनण्याच्या विचारांनी रोमांचित व्हायचे'
प्रियंकाने पीपुल मॅगझीनसोबत बोलताना पुढे सांगितले की, 'मला विवाहित असल्याच्या आयडियावर प्रेम होते. मी नवरी बनण्याच्या विचाराने रोमांचित व्हायचे, याच्या अर्थाची जाणीव नसताना मी रोमांचित व्हायचे'

प्रियंकाने पुढे म्हटले की, जेव्हा तुम्हाला योग्य व्यक्ती भेटते तेव्हा प्रत्येक गोष्ट खूप सहज होते. अभिनेत्रीने या दरम्यान आपल्या व्यक्तिमत्तविषयीही बातचित केली. तिच्यानुसार, ती खूप महत्वाकांक्षी आहे. ती म्हणते की, वाढत्या वयासोबत मला वाटले की, एखाद्या महिलेने महत्वाकांक्षी असणे चांगली गोष्ट नाही. मात्र नंतर तिला जाणीव झाली की, हिच तिची ताकद आहे.

2018 मध्ये झाले प्रियंका-निकचे लग्न
प्रियंका चोप्राने 1 डिसेंबर 2018 मध्ये इंटरनॅशनल सिंगर निक जोनाससोबत लग्न केले होते. हे लग्न जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये झाले होते. 28 वर्षांचा निक प्रियंकापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.

नुकताच निकसाठी ठेवला होता करवा चौथ
प्रियंकाने नुकताच निक जोनाससाठी दुसऱ्यांदा करवा चौथचा व्रत ठेवला होता. लाल साडीमध्ये पुजेचे ताट घेत प्रियंकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

एका मुलाखतीत प्रियंकाच्या आई मधु चोप्रा म्हणाल्या होत्या की, 'करवा चौथला निकही प्रियंकासोबत व्रत ठेवू इच्छितो पण प्रियंका असे करु देत नाही. प्रियंकाला व्रत ठेवायची सवय आहे, पण निक जास्त वेळ फास्टिंग करु शकत नाही.'

बातम्या आणखी आहेत...