आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देसी गर्लने प्रॉपर्टीची विक्री केली:प्रियांका चोप्राने मुंबईत दोन प्रॉपर्टी विकल्या, ऑफिस भाड्याने दिले, 7 कोटी रुपयांमध्ये झाली डील

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रियांकाने यावर्षी मार्चमध्ये मुंबईत 7 कोटी रुपयांना आपली संपत्ती विकली आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपल्या प्रॉपर्टीमुळे सध्या चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रियांकाने तिची काही मालमत्ता विकली तर काही लीजवर दिली आहे. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, प्रियांकाने यावर्षी मार्चमध्ये मुंबईत 7 कोटी रुपयांना आपली संपत्ती विकली आहे. वर्सोवा, अंधेरी वेस्टस्थित राज क्लासिक बिल्डिंगमध्ये सातव्या मजल्यावरील एका अपार्टमेंटचा यात समावेश असून त्याची किंमत तीन कोटी आहे. याच फ्लोअरवरील आणखी एक अपार्टमेंट प्रियांकाने चार कोटीत विकले आहे.

ऑफिसही भाड्याने दिले

एवढेच नाही तर प्रियांकाने मुंबईतील आपल्या ऑफिसची जागा भाड्याने दिली आहे. प्रियंकाचे हे ऑफिस मुंबईच्या ओशिवरा येथे असून यावर्षी जूनमध्ये भाड्याने देण्यात आले आहे. 2040 चौरस फुटांच्या या ऑफिससाठी प्रियांकाला दरमहा 2.11 लाख रुपये भाडे मिळते. प्रियांकाने यापूर्वी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अंधेरी वेस्टच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्सस्थित करण अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील तिचे एक अपार्टमेंट विकले होते. त्याची किंमत दोन कोटी रुपये होती.

लॉस एंजिलिसमध्ये खरेदी केली आलिशान प्रॉपर्टी

प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनास यांनी लग्नानंतर अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्ये एक आलिशान घर विकत घेतले. दोघांनी 20,000 स्क्वेअर फूटची मालमत्ता खरेदी केली असून यासाठी त्यांनी 144 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या या आधुनिक घरात सात बेडरुम, 11 बाथरुम, उंच छत आणि बाहेरची भरपूर जागा आहे. याची पुष्टी स्वत: प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनीही केली. प्रियांका तिच्या सुंदर घराची छायाचित्रेही बर्‍याचदा शेअर करत असते. निक आणि प्रियांकाचे डिसेंबर 2018 मध्ये लग्न झाले.

बातम्या आणखी आहेत...