आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीसीचे सिक्रेट्स:प्रियांका चोप्रा म्हणाली - मिस वर्ल्डच्या क्राउनिंग वॉकवेळी लोकांना वाटले की मी नमस्ते करतेय, परंतु प्रत्यक्षात मी ड्रेस पकडला होता

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रियांका जेव्हा मिस वर्ल्ड झाली होती तेव्हा ती सर्वात जास्त अनकम्फर्टेबल होती.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने आजवर रेड कार्पेटवर स्टनिंग कपडे परिधान केले आहेत. स्टाइल स्टेटमेंटमध्येही तिला जागतिक स्तरावर वेगळी ओळख आहे. मात्र काही वेळा तिने परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिला अडचणीदेखील आल्या. यापैकी दोन ड्रेस असे होते, ज्यात ती सर्वात जास्त अनकम्फर्टेबल होती. यापैकी पहिल्यांदा जेव्हा तिने मिस वर्ल्डचा मुकुट घातला आणि दुस-यांदा जेव्हा तिने 2018 मध्ये रोल्फ लॉरेनचा ड्रेस परिधान केला होता.

वॉक करताना नमस्ते करत राहिले
प्रियांकाने अलीकडेच पीपल्स मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, आयुष्यातील सर्वात मोठी संधी म्हणजे जेव्हा ती मिस वर्ल्ड झाली तेव्हा ती सर्वात जास्त अनकम्फर्टेबल होती. ती म्हणते - मी खूप तणावातत होता. कार्यक्रमाच्या शेवटी, ड्रेसची संपूर्ण टेप निघून गेली होती. जेव्हा मी वॉक करत होते, तेव्हा नमस्ते करत राहिले. लोक असा विचार करत होते की मी नमस्ते करतेय, पण प्रत्यक्षात मी माझा ड्रेस पकडून ठेवला होता.

प्रियांकाला कोर्सेटमध्ये श्वास घेता येत नव्हता

ड्रेसबद्दलचा दुसरा प्रसंग तिने सांगितला. 2018 च्या मेट गाला इव्हेंटमध्ये प्रियांकाने रॉल्फ लॉरेनचा ड्रेस परिधान केला होता. पीसी म्हणते- हा रॉल्फ लॉरेनचा ब्लड रेड ड्रेस होता. ज्यावर गोल्डन हेड गियर होते. पण त्या ड्रेसच्या आत असलेला कॉर्सेटमुळे मला त्यात श्वास घेता येत नव्हता. डिनरच्या वेळी बसणे अवघड झाले होते. साहजिकच त्या दिवशी मी जेऊ शकले नाही.

करवा चौथ साजरे करण्यासाठी घरी परतली
प्रियांका गेल्या काही दिवसांपासून जर्मनीत मॅट्रिक्स 4 चे चित्रीकरण करत होती. या चित्रपटात कीनू रीव्हस मुख्य भूमिकेत आहे. अद्याप प्रियांकाच्या भूमिकेविषयी फारशी माहिती उघड झालेली नाही.
करवा चौथच्या निमित्ताने ती अमेरिकेत आपल्या सासरी परतली आहे. येथे तिने पती निक जोनाससोबत लग्नानंतरचा दुसरा करवा चौथ साजरा केला.