आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडिया:आगळ्या वेगळ्या हेअरस्टाईलसोबत बाथरोबमध्ये डान्स करतांना दिसली प्रियांका. 41 लाखांपेक्षा जास्त पाहिला गेला व्हिडीओ

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या व्हिडीओला 10 तासांत 41 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय.

प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर एका फोटोशूटचा बिहाईंड द सीन व्हिडीओ शेअर केला आहे, यात ती बाथरोब घालून दिसतेय आणि डान्स करताना आपली आगळीवेगळी हेअरस्टाईलसुद्धा दाखवतेय.  प्रियांकाने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'विकेण्ड डान्स.' या व्हिडीओला 10 तासांत 41  लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय. 

यूकेच्या एका मॅगझिनसाठी होतं फोटोशूट

प्रियांकाने हे फोटोशूट युकेच्या टेटलर या मॅगझिनच्या मेच्या अंकासाठी केलं होतं. मात्र कोरोना व्हायररच्या माहामारीमुळे मॅगझिन डिजिटली पब्लिश करण्यात आलं. हे फोटोशूट जुन्या काळातील हॉलिवू़ड थीमवर आधारीत होते.  प्रियांकाने या फोटोेशूटसाठी अनेक प्रकारचे गेटअप सुद्धा केले होते.

आजीशी संबंधित किस्सा शेअर केला होता 

या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने तिच्या आजीशी संबंधित एक मनोरंजक किस्सा शेअर केला. तिने सांगितले होते, "माझ्या आईच्या सर्व बहिणी उच्चशिक्षित होत्या आणि माझे वडील सर्जन असण्यासोबतच मुक्त विचार क्रिएटिव्ह, संगीतकार आणि कलाकारदेखील होते. आजी माझ्याबद्दल नेहमीच म्हणायची, हिच्याशी कोण लग्न करेल? तिला स्वयंपाक करता येत नाही. वडील म्हणायचे, "मी तिच्यासोबत कुक पाठवले, तिला किचनमध्ये जायची गरज पडणार नाही."

प्रियांका पुढे म्हणाली, "माझी आई जेव्हा लग्न करुन आली होती, तेव्हा तिलाही स्वयंपाक येत नव्हता. पापानी तिला शिकवले. तिला आपल्या पसंतीचे सर्व पदार्थ करायला शिकवले."

जेव्हा वडिलांनी टाइट कपडे घालण्यावर बंदी घातली होती

याच मुलाखतीत प्रियांकाने सांगितले होते की, जेव्हा ती 16 वर्षांची होती तेव्हा वडिलांनी तिच्या टाइट कपडे परिधान करण्यावर बंदी घातली होती. प्रियांका म्हणाली होती, "जेव्हा मी यूएस (शालेय शिक्षणासाठी) मध्ये होते तेव्हा  कुरळे केस असलेली केवळ 12 वर्षांची मुलगी होती आणि परत आली तेव्हा 16 वर्षांची होती. मला असे वाटते की, त्यावेळी माझे वडील माझ्याकडे बघून हादरले होते. पहिले काही आठवडे त्यांना माझ्याबरोबर काय करावे हे देखील माहित नव्हते."

प्रियांकाच्या म्हणण्यानुसार, मुले शाळेनंतर तिचा पाठलाग करायला लागली होती. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला केवळ रुममध्ये लॉकच केले नाही तर तिच्या टाइट कपडे घालण्यावरही बंदी घातली होती.  प्रियांका म्हणते, "त्याकाळात आमच्यात  मोठा इगो क्लॅश होता.'

बातम्या आणखी आहेत...