आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियांकाची कबुली:प्रियांका चोप्राने सांगितले करिअर सिक्रेट, म्हणाली - चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे बिघडला होता चेहरा, हातून गेले होते 2 सिनेमे

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रियांकाने आपल्या ‘अनफिनिश्ड’ पुस्तकात वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या आपल्या ‘अनफिनिश्ड’ पुस्तकामुळे खूपच चर्चेत आहे. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर तिच्या जीवनाविषयी बऱ्याच गोष्टीचा खुलासा झाला आहे. नुकतेच ही बाब समोर आली की, 2000 मध्ये मिस वर्ल्ड बनल्यानंतर तिने 4 चित्रपट साइन केले होते, मात्र नंतर तिला दोन चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. खरं तर, याच काळात तिच्या चेहऱ्याची शस्त्रक्रिया झाली होती.

चुकीच्या शस्त्रक्रियामुळे तिला दोन चित्रपट गमवावे लागले होते. या 4 चित्रपटापैकी एक चित्रपट तिच्या पहिल्या रीजनल चित्रपट होता. प्रियांकाने तामिळ चित्रपट ‘थमिजान’मधून पर्दापण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत सुपरस्टार विजय दिसला होता. हा चित्रपट 2000 मध्ये रिलीज झाला होता

‘थमिजान’ याविषयी प्रियंकाने आपल्या पुस्तकात लिहिले आहे. ‘सर्जरीमुळे माझा लूक बिघडला होता मात्र चित्रपटाच्या टीमने मला खूप सहकार्य केले. त्यामुळेच माझा आत्मविश्वास पुन्हा परतला होता. शूटिंगदरम्यान कोणीच मला माझ्या लूकविषयी बोलत नव्हते. चित्रपटासाठी मी तामिळ भाषा शिकले होते. ते शिकण्यासाठी एका तामिळ शिक्षकाने माझी खूप मदत केली होती.