आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हृतिकची उदारता:प्रियंका चोप्राने सांगितले - जेव्हा वडिलांची प्रकृती बिघडली तेव्हा हृतिकने सेटवरूनच केली होती बोस्टनच्या फ्लाइटची व्यवस्था

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रियांकाने तिच्या 'अनफिनिश्ड' या आत्मचरित्रातून हृतिकची उदारता जाहीर केली

प्रियंका चोप्राने हृतिक रोशनसोबत क्रिश, अग्निपथ आणि क्रिश-3 या तीन चित्रपटांत काम केले आहे. हृतिकची उदारता प्रियांकाने तिच्या 'अनफिनिश्ड' या आत्मचरित्रातून जाहीर केली आहे. त्या पुस्तकात तिने एका घटनेचा उल्लेख केला. 'क्रिश' चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना तिला अचानक एक दिवस कळले की तिचे वडील डॉ. अशोक चोप्रा यांना एक गंभीर आजार आहे. करियरच्या दृष्टीने 'क्रिश' तिच्यासाठी मोठा चित्रपट होता.

हृतिकने केली होती प्रियंकाची मदत

हृतिकला प्रियंकाच्या वडिलांच्या गंभीर आजाराविषयी समजले की, त्यांना परदेशातील एका रुग्णालयात हलवण्याची आवश्यक आहे. त्यावेळी हृतिकने कसलीही कसर सोडली नाही आणि शक्य तितक्या सर्व गोष्टींची मदत करण्याचा प्रयत्न केला. प्रियंकाने सांगितले की, "हृतिकने फोन केला आणि एअर इंडियामधील त्याच्या ओळखीचा वापर करून माझ्या वडिलांकरिता बोस्टनसाठी तत्काळ फ्लाइटची व्यवस्था केली."

प्रियंकाने 'अनफिनिश्ड'मध्ये सांगितला किस्सा

डॉ. चोपडा यांना बोस्टनच्या एका रुग्णालयात हलवले आणि आवश्यक उपचार आणि शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. तेव्हा त्यांचा जीव वाचला. कृतज्ञ प्रियंकाने हृतिकबद्दल कौतुक व्यक्त करताना लिहिले, "जर त्यावेळी आमच्याकडे हृतिक आणि त्याचे वडील राकेश सर नसते तर मला शंका आहे की त्यावेळी माझे वडील त्यावेळी वाचले नसते. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे कोणताच पर्याप्त मार्ग नाही. ही घटना अतिशय वैयक्तिक आणि हृदयस्पर्शी आहे." प्रियांकानेही या पुस्तकात हृतिकने वेळेवर मदत केल्याबद्दल त्याचे आभार मानले आहेत.

बातम्या आणखी आहेत...