आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पा मोरया!:प्रियांका चोप्राने लेक मालतीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, मुंबईत 'सिटाडेल'चे करत आहे प्रमोशन

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी 'सिटाडेल' या वेब सिरीजच्या प्रमोशनच्या निमित्ताने मुंबईत आहे. दरम्यान प्रियांकाने गुरुवारी तिची लेक मालतीसोबत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. मंदिरात पूजाअर्चा करतानाचा प्रियांका आणि मालतीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात प्रियांका आपल्या चिमुकलीला कडेवर घेऊन दिसतेय.

प्रियांकाची लेक मालती पहिल्यांदाच भारतात आली आहे. अशातच प्रियांका तिला सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंदिरात घेऊन गेली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मंत्रोच्चाराच्या वेळी पुजारी प्रियांका आणि मालती यांना गंध लावताना आणि त्यांना आशीर्वाद देताना दिसत आहेत.

प्रियांकाचे आगामी प्रोजेक्ट्स
लवकरच प्रियांका 'सिटाडेल' या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. ही सिरीज 28 एप्रिल रोजी Amazon Prime Video वर स्ट्रीम येईल. याशिवाय प्रियांका सॅम हेगनसोबत 'लव्ह अगेन' या चित्रपटातही दिसणार आहे. हा चित्रपट 12 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. शिवाय प्रियांका लवकरच आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत 'जी ले जरा'चे शूटिंग सुरू करणार आहे.