आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका चोप्राचा नवरा रुग्णालयात:28 वर्षीय निक जोनास शूटिंग सेटवर जखमी, रुग्णवाहिकेतून नेण्यात आले होते रुग्णालयात

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निकला किती आणि कुठे दुखापत झाली, याची माहिती समोर आलेली नाही.

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती आणि प्रसिद्ध हॉलिवूड स्टार निक जोनास रुग्णालयात दाखल होता. 'द वॉइस' या सांगितिक रिअॅलिटी शोच्या शूटिंगदरम्यान निकला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले होते. ही घटना 15 मे रोजी घडली.

रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
28 वर्षीय निक लॉस एंजिलिस येथे शूटिंग करत होता. शनिवारी शूटिंग सुरु असताना त्याला दुखापत झाली. त्याला ताडतीने लॉस एंजिलिस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याला किती आणि कुठे दुखापत झाली, याची माहिती समोर आलेली नाही. असेही सांगितले जाते की, एक दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर रविवारी निकला डिस्चार्ज देण्यात आला आहे. निक किंवा प्रियांका यांनी स्वतः मात्र याविषयीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केलेली नाही.

निक-प्रियांकाने सुरु केला फंड प्रोग्राम
प्रियांका सध्या शूटिंगच्या निमित्ताने लंडनमध्ये आहे, तर निक आता अमेरिकेत आहे. मात्र मागील काही दिवस तो प्रियांकासोबत लंडनमध्ये होता.या दोघांनी अलीकडेच कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी एक मोठे पाऊल उचलले होते. त्यांनी भारतासाठी फंड प्रोग्राम सुरु केला. याची माहिती देणारा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता.

बातम्या आणखी आहेत...