आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियांका चोप्राची अचिव्हमेंट:प्रियांकाने लिहिलेले 'अनफिनिश' हे पुस्तक अवघ्या 12 तासांत ठरले अमेरिकेतील 'बेस्ट सेलर', अभिनेत्रीने लिहिले - 'मला आशा आहे हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल'

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी शुक्रवारी प्रियांकाने आपल्या पुस्तकाचे कव्हर सोशल मीडियावर शेअर केले होते.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने लिहिलेले अनफिनिश हे आत्मचरित्र अलीकडेच प्रकाशित झाले आहे. अवघ्या 12 तासांमध्ये हे पुस्तक बेस्ट सेलर ठरले आहे. स्वतः प्रियांकाने एक पोस्ट शेअर करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.

प्रियांकाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'केवळ 12 तासांपेक्षा कमी कालावधीत ‘अनफिनिश’ला लोकप्रियतेमध्ये प्रथम स्थान दिल्यामुळे मनापासून आभार. मला आशा आहे हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल.'

यापूर्वी शुक्रवारी प्रियांकाने आपल्या पुस्तकाचे कव्हर सोशल मीडियावर शेअर केले होते.

शिवाय एक व्हिडिओदेखील तिने इंन्स्टाग्रामवर शेअर केला होता. "ही माझी गोष्ट आहे," असे कॅप्शन तिने दिले होते. मिस वर्ल्ड होण्यापासून ते बॉलिवूडमधील तिचा प्रवास, स्ट्रगल, अफेअर्स, निकवरचे प्रेम आणि हॉलिवूडमधील तिची एण्ट्री या सगळ्यावर तिने प्रकाश टाकला आहे.

'स्काय इज पिंक'मध्ये दिसली होती
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे, प्रियांका शेवटची 'द स्काई इज पिंक' या बॉलिवूड चित्रपटात झळकली होती. स्वतः प्रियांका या चित्रपटाची निर्मातीदेखील होती. तिच्यासह फरहान अख्तर आणि जायरा वसीम यांच्या चित्रपटात भूमिका होत्या.

बातम्या आणखी आहेत...