आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीच्या तीन अभिनेत्री एकत्र:प्रियांका, कतरिना आणि आलिया म्हणताहेत 'जी ले जरा', फरहान अख्तर करणार चित्रपट दिग्दर्शित; बघा चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडच्या तीन आघाडीच्या नायिका आता मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहेत. कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा या तिघी जणी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन स्पेस शेअर करताना आपल्याला दिसणार असून त्यांच्या या नवीन चित्रपटाचे नाव आहे 'जी ले जरा'.

'दिल चाहता है' आणि 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'नंतर पुढचा रोड ट्रीप चित्रपट सादर करताना एक्सेल एंटरटेनमेंटच्या या जॉनरची कमान यावेळी या तीन अभिनेत्री सांभाळणार आहेत.

या चित्रपटाची कथा जोया अख्तर, फरहान अख्तर आणि रीमा कागती यांची असून रीमा कागती, जोया अख्तर, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर हे निर्माते आहेत.या चित्रपटाबाबतची आणखी एक खास गोष्ट ही आहे की याचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार असून चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...