आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाच्या 'लव्ह अगेन'चा फर्स्ट लूक आउट:सॅम ह्यूगनसोबत दिसणार केमिस्ट्री, आता फेब्रुवारीऐवजी 12 मे रोजी प्रदर्शित होणार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात आली आहे. दरम्यान, नुकताच देसी गर्लने तिचा आगामी हॉलिवूड चित्रपट 'लव्ह अगेन'चा फर्स्ट लूक रिव्हील केला आहे. फर्स्ट लूकसोबतच प्रियांकाने चित्रपटाची नवीन रिलीज डेटही जाहीर केली आहे. आधी हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु आता तो 12 मे 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रियांकासोबत सॅम ह्यूगनची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

प्रियंका चोप्राने शेअर केली पोस्ट

प्रियांका चोप्राने चित्रपटाचा फर्स्ट लूक रिव्हील करताना सांगितले- 'लव्ह अगेन चित्रपट 12 मे रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. जो कोणी मला ओळखतो त्याला माहित आहे की, मला सेलीन डियोन किती आवडतो. आमच्या चित्रपटाचे संगीत त्यांचेच असेल हे सांगताना मला अभिमान वाटतोय.' देसी गर्लने तिचा को-स्टार सॅम ह्यूगनचा उल्लेख करत लिहिले - 'सॅम आपण करुन दाखवले.'

सॅम ह्यूगन कोण आहे?
जर तुम्हाला हॉलिवूडचे चित्रपट पाहायला आवडत असतील तर तुम्हाला सॅम ह्यूगनबद्दल माहिती असेलच. तो एक स्कॉटिश अभिनेता असून 'द स्पाय हू डम्प्ड मी' या सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. सॅमने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाच्या नवीन रिलीजच्या तारखेबाबत पोस्ट देखील केली आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

जिम स्ट्रॉस दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांका चोप्रा मीरा रे नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. मीराचा नवरा आता या जगात नाही, असे असूनही ती त्याला फोनवर रोज मेसेज पाठवते. अचानक कहाणीत एक ट्विस्ट येतो, मीराचे मेसेज रॉब बन्स नावाच्या माणसाकडे जाऊ लागतात. कारण तो फोन नंबर रॉबपर्यंत पोहोचतो. मेसेज वाचल्यानंतर रॉबला आता मीराला भेटायचे आहे. ज्यासाठी तो मेगास्टार सलीना डियोनची मदत घेतो. या चित्रपटात सलीना स्वतः सलीना ही भूमिका साकारत आहे. देसी गर्लचा हा चित्रपट खूपच रोमँटिक असणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक पूर्वी 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' असे होते, परंतु नंतर चित्रपटाची शीर्षक बदलून 'लव्ह अगेन' असे करण्यात आले.

'लव्ह अगेन'ची होणार 'क्लब 2'सोबत टक्कर
प्रियांका आणि सॅम व्यतिरिक्त या चित्रपटात रसेल टोवे, स्टीव्ह ओरम, लिडिया वेस्ट, सीलिया इमरी आणि सोफिया बार्कले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर क्लब 2: द नेक्स्ट चॅप्टर या चित्रपटाशी टक्कर होणार आहे.

प्रियांकाचे आगामी चित्रपट
वर्क फ्रंटवर, प्रियांका चोप्रा लवकरच अॅक्शनपॅक्ड वेब सिरीज 'सिटाडेल'मध्ये दिसणार आहे. याशिवाय प्रियांका लवकरच फरहान आणि झोया अख्तर यांच्या 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार आहे. ती लवकरच आलिया आणि कतरिना कैफसोबत चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याच्या बातम्या आहेत. या चित्रपटाद्वारे प्रियांका प्रदीर्घ काळानंतर बॉलिवूड चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...