आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेश-जिनिलियाच्या 'मिस्टर ममी' चित्रपटावरून वाद:निर्माता आकाश चॅटर्जी यांचा चित्रपटाच्या निर्मात्यांवर कथा चोरल्याचा आरोप

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा यांचा आगामी चित्रपट 'मिस्टर ममी'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडला आहे. दरम्यान, चित्रपट निर्माता आकाश चॅटर्जी यांनी 'मिस्टर ममी'च्या निर्मात्यांवर त्यांची कथा आणि संकल्पना चोरल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आकाश यांनी दावा केला की, मिस्टर मम्मीच्या निर्मात्यांनी केवळ त्यांच्या चित्रपटाची संकल्पनाच नाही तर संपूर्ण कथा कॉपी केली आहे. आकाश हे बंगाली चित्रपट दिग्दर्शक अग्निदेव चॅटर्जी यांचे पुत्र आहेत.

आकाश चॅटर्जी यांनी पोस्ट शेअर केली

आकाश यांनी सोशल मीडियावर अनेक स्क्रीनशॉट शेअर करत चित्रपटाच्या निर्मात्यांवर आरोप केले आहेत. पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले - 'विकी पेट से' या माझ्या चित्रपटासंदर्भात 2020 मध्ये टी-सीरिजशी माझी चर्चा झाली होती. ते या चित्रपटाची सहनिर्मिती करणार होते. मात्र, नंतर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता त्यांनी चित्रपटाची संकल्पना चोरून आपल्या पद्धतीने मांडली आहे,' असे त्यांनी म्हटले आहे.

आकाश यांना या चित्रपटात आयुष्मान खुराणाला कास्ट करायचे होते
आकाश यांनी त्यांच्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. विकी पेट असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी आयुष्मान खुराणा, भूमी पेडणेकर, अन्नू कपूर आणि गजराज राव यांची नावे अंतिम केली होती. आकाश यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट टी-सीरीजसोबत शेअर केली होती, पण नंतर त्याला प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा त्यांनी रितेश आणि जिनिलियाच्या 'मिस्टर ममी' या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हा त्यांना समजले की या चित्रपटाची कथा त्यांच्या 'विकी पेट से' या चित्रपटाची कॉपी आहे.

आकाश चित्रपटावर कायदेशीर कारवाई करणार
आकाश यांनी पोस्टमध्ये सांगितले की, त्यांचा 'विकी पेट से' हा चित्रपट स्क्रीन प्ले रायटर्स असोसिएशनमध्ये नोंदणीकृत आहे. आता ते 'मिस्टर ममी'च्या निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे. त्यांचे त्यांच्या वकिलाशी बोलणे झाले आहे. आकाश यांनी सांगितल्यानुसार, त्यांना या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून कोणताही दंड किंवा पैसा नको आहे. त्यांना फक्त चित्रपटात त्यांचे क्रेडिट हवे आहे.

'मिस्टर ममी' चे दिग्दर्शन शाद अलीने केले आहे तर टी-सीरीजची निर्मिती आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...