आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाद:'पाताल लोक'वर जातीवाचक शब्दाचा वापर करुन नेपाळी समुदायाचा अपमान केल्याचा आरोप, निर्माती अनुष्का शर्माला कायदेशीर नोटीस 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'पाताल लोक' ही वेब सीरिज अनुष्का शर्माचे प्रॉडक्शन हाऊस 'क्लीन स्लेट'च्या बॅनरखाली बनली आहे. याचे आणखी तीन निर्माते आहेत.

अ‍ॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अलीकडेच सुरु झालेल्या 'पाताल लोक' या वेब सीरिजवरून वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर शोची निर्माती अनुष्का शर्माला कायदेशीर नोटीस पाठविली गेली आहे. वेब सीरिजमधील संवादावरुन हा वाद निर्माण झाला असून त्यामुळे नेपाळी समुदायाचा अपमान झाल्याचे म्हटले गेले आहे.

  • काय आहे प्रकरण?

अनुष्काला 18 मे रोजी पाठवण्यात आलेल्या नोटीसीमध्ये जातीवाचक शब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या शब्दांच्या वापरामुळे नेपाळी समुदायाचा अपमान झाल्याचे म्हटले आहे. ही नोटीस लॉयर गिल्ड मेंबर वीरेन सिंह गुरुंग यांनी अनुष्काला पाठविली आहे. त्यांच्या मते, या सीरिजच्या दुस-या भागामध्ये एक महिला पोलिस अधिकारी दिसत आहे. ती चौकशीदरम्यानच्या दृश्यात नेपाळी भूमिका साकारणा-या व्यक्तीचा त्याच्या जातीवरुन उल्लेख करते आणि सोबतच अश्लिल शब्दाचा वापर करते. जे अगदी चुकीचे आहे. 

  • नेपाळी या शब्दाला आक्षेप नाही

गुरुंग म्हणाले की, नेपाळी या शब्दावर आमचा आक्षेप नाही, परंतु त्यानंतर बोललेला शब्द आम्हाला मान्य नाही. या कारणासाठी आम्ही शोच्या चार निर्मात्यांपैकी एक असलेल्या अनुष्काला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. गुरुंग म्हणाले की, अद्याप अनुष्का किंवा तिच्या टीमकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. ज्यानंतर ते आता अ‍ॅमेझॉनशी या विषयावर चर्चा करतील.

  • गोरखा समाजाने ऑनलाइन याचिका दाखल केली

गोरखा समुदायने जातीवादक शब्द वापरल्यामुळे नाराजी व्यक्त केली असून हा शब्द सीरिजमधून काढून टाकण्यात यावा अशी मागणीही केली आहे. या प्रकरणात, गोरखा समुदायाकडून 18 मे रोजी या विरोधात ऑनलाइन याचिका दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच सीरिजमधून हा शब्द म्यूट करण्यात यावा आणि सबटायटलमध्ये तो ब्लर करुन एडिटेड एपिसोड अपलोड करण्याची मागणी केली आहे. 

  • 15 मे पासून अ‍ॅमेझॉनवर सुरु झाली वेब सीरिज

'पाताल लोक' ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम वर 15 मेपासून सुरु झाली आहे. या वेब शोमध्ये जयदीप अहलावत, गुल पनाग, नीरज कबी, अभिषेक बॅनर्जी, स्वस्तिक मुखर्जी मुख्य भूमिकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...