आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:निर्माता-दिग्दर्शक हरीश शाह यांचे कर्करोगाने निधन,  त्यांच्या कर्करोगावर आधारित  'Why Me' शॉर्ट फिल्मला मिळाला होता राष्ट्रपती पुरस्कार 

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हरीश शाह जवळजवळ 10 वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते.

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक हरीश शाह यांचे मंगळवारी सकाळी सहा वाजता कर्करोगाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 76 वर्षांचे होते. सुमारे चार दशकं ते चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. कर्करोगाशी लढा देत असताना त्यांनी या आजाराशी झगडत असलेल्या लोकांची कहाणी जगासमोर आणण्यासाठी 'व्हाय मी' हा लघुपट बनवला होता.  या लघुपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. मुंबईतील पवनहंस स्मशानभूमीत दुपारी 1 वाजता हरीश शाह यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • हरीश यांचा चित्रपट प्रवास 

हरीश शाह यांनी दिल और मोहब्बत, मेरे जीवन साथी, काला सोना, धन दौलत, राम तेरे कितने नाम, हॉटेल, जाल - द ट्रॅप,  जलजाला, अब इंसाफ होगा यासारखे चित्रपट बनवले.  2003 मध्ये सनी देओल स्टारर जाल-द ट्रॅप हा हरीश यांची निर्मिती असलेला शेवटचा चित्रपट होता. हरीश यांचे भाऊ विनोद यांच्या म्हणण्यानुसार, ते जवळजवळ 10 वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. 

  • सोशल मीडियावर सक्रिय

हरीश चित्रपटांपासून दूर झाले होते, पण आपला जास्तीत जास्त वेळ ते सोशल मीडियावर घालवत होते. ट्विटरवर ते कायम आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दलचे विचार आणि माहिती शेअर करत असे. कर्करोगाशी झुंज देत असतानाचे स्वतःचे छायाचित्र त्यांनी 'व्हॉय मी' या पोस्टरवर शेअर केले होते ज्यामध्ये त्यांच्या घशात छिद्र दिसले होते. त्यामुळे सुमारे 2 वर्षे तो बोलू शकले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...