आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कॉमेडी फिल्म रिमेक:निर्माती एकता कपूरने 50 कोटी रुपयांत वरुण-साराच्या 'कुली नंबर 1'चे वितरण हक्क केले खरेदी

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा करार कोरोना महामारीच्या आधी झाला होता.
Advertisement
Advertisement

डिजिटल प्रदर्शन सुरू असताना वरुण धवन आणि सारा अली खानच्या आगामी ‘कुली नंबर 1’ या विनोदी चित्रपटाच्या थिएट्रिकल रिलीजची तयारी सुरू आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एकात कपूरच्या बालाजी प्रॉडक्शन्सला त्याचे वितरण हक्क विकले आहेत, असे कळते.

वरुण आणि साराचा हा पहिलाच एकत्रित चित्रपट असून त्यात परेश रावल, राजपाल यादव, जावेद जाफरी यांसारखे इतर कलाकारही आहेत. भारतात चित्रपट वितरणासाठी बालाजीने जवळपास 50 कोटी रुपये घेतले आहेत. हा करार कोरोना महामारीच्या आधी झाला होता.

नववर्षानिमित्त हा विनोदी चित्रपट संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करेल, असे सूत्रांचे मत आहे. हा चित्रपट 1995 मध्ये आलेल्या गोविंदा, करिश्मा कपूर, कादर खान यांच्या याच नावाच्या ‘कुली नंबर वन’ या चित्रपटाचाच रिमेक आहे. हा सुपरहिट चित्रपटही डेव्हिड धवन यांनीच दिग्दर्शित केला होता, हे विशेष.

Advertisement
0