आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रेकिंग न्यूज:मागील 7 दिवसांपासून दुबई पोलिसांच्या कोठडीत आहेत निर्माते गौरंग दोषी, दोन लाख दिरहम दिले नसल्याचा ट्रॅव्हल एजंटचा आरोप

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन लाख दिरहम म्हणजेच सुमारे 40 लाख रुपये गौरंगने ट्रॅव्हल एजंटला दिले नसल्याचा आरोप आहे.

'आँखे'सारखा सुपरहिट चित्रपट बनवणारे गौरंग दोषी गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरच्या काळात आपल्या आगामी 'सेवन्थ सेन्स' या वेब शोच्या शूटिंगसाठी दुबईत गेले होते. त्यानंतर या शोचे मुख्य फायनान्सर सोहेल मोहम्मद अल झरुनी यांनी या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला. त्यामुळे वेब शोच्या संपूर्ण टीमला भारतात परतावे लागले. सुमारे दीडशे जणांच्या टीमला दुबईला घेऊन गेलेल्या गौरंग यांच्याविरोधात आता ट्रॅव्हल एजंटने गुन्हा दाखल केला आहे.

एजंटचा आरोप आहे की, गौरंगने त्यांना दोन लाख दिरहम एवढे बिल म्हणजेच सुमारे 40 लाख रुपये त्यांना दिले नाहीत. यामुळे गौरंग दोषी यांना दुबई पोलिसांनी अटक केली आहे. गौरंग हे गेल्या 7 दिवसांपासून तुरूंगात आहेत.

गौरंग यांच्या अटकेची टीम मेंबर्सनाही माहिती नाही
गौरंग यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणा-या आनंदसोबत याविषयी चर्चा झाली. आनंदने सांगितले, असे काही घडले असावे असे वाटत नाही. आमच्या पर्यंत अशी कोणतीही बातमी पोहोचली नाही. पण आम्ही इतर प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याने गेल्या 10 दिवसांपासून आमचा त्यांच्याशी संपर्क झाला नाही. सर बरे आहेत की नाही, याची माहिती घेतो, असे आनंदने आमच्याशी बोलताना सांगितले.

क्रिएटिव्ह मतभेदामुळे फायनान्सरने हात मागे खेचले

प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित लोकांनी सांगितल्यानुसार, “फायनान्सर आणि गौरांग दोषी यांच्यात क्रिएटिव्ह मतभेद निर्माण झाले. त्यामुळे फायनान्सरने पैसे देणे बंद केले. कलाकार आणि क्रू मेंबर्सना पैसे तिथे उभे केले जातील, असे सांगून दुबईत बोलावण्यात आले. बहुतेक कलाकारांना 20 टक्के सायनिंग अमाउंट देऊन दुबईत बोलावण्यात आले, मात्र तेथे गेल्यावर वास्तव वेगळे होते."