आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन?:निर्माता करण जोहरच्या पार्टीचा वर्षभरापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल, शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंह सिरसांची एनसीबीकडे तक्रार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी याप्रकरणी एनसीबीच्या अध्यक्षांची भेट घेतली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती तुरुंगात आहे. रियाने ड्रग्ज प्रकरणाचा तपास करण-या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला बॉलिवूडमधील 25 मोठी नावे सांगितल्याची चर्चा आहे. आता यातच चित्रपट निर्माता करण जोहरने वर्षभरापूर्वी होस्ट केलेल्या एका पार्टीतील व्हिडिओसंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

करण जोहरने होस्ट केलेल्या या पार्टीत अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. याच पार्टीमधील एका व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये करण जोहरसह अभिनेता विक्की कौशल, शाहिद कपूर, दीपिका पदुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर आणि वरुण धवनसह अनेक कलाकार दिसत आहेत. या पार्टीमध्ये या सर्व कलाकारांनी अमली पदार्थांचे सेवन केले असल्याचा दावा शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी एनसीबीच्या अध्यक्षांची भेट घेतली आहे.

मनजिंदर सिंह सिरसा यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, 'मी एनसीबीचे अध्यक्ष राजेश अस्थाना यांची भेट घेतली असून, व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील पार्टीचे आयोजन केल्याप्रकरणी करण जोहर आणि इतरांविरुद्ध चौकशीची मागणी मी अस्थाना यांना केली आहे.'

त्यांनी आणखी एक ट्विट करत हा व्हिडिओ पुन्हा एकदा शेअर केला आहे. 'हा व्हिडिओ आठवा, या व्हिडिओमध्ये दिसणारे चेहरे लवकरच एनसीबीच्या कार्यालयाबाहेर दिसतील,' असेही ते म्हणाले आहेत.

एनसीबीकडे का केली तक्रार?

या संपूर्ण प्रकरणावर सिरसा अलीकडेच रिपब्लिक इंडियाशी बोलले आहेत. त्यांच्या तक्रारीवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली नाही, असे त्यांनी म्हटले आहे, त्यामुळे त्यांनी एनसीबीकडे तक्रार दाखल केली आहे.