आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासा:करिम मोरानींना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, कोरोनाची दुसरी चाचणी आली निगेटिव्ह

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोरानी हे हार्ट पेशंट आहेत. त्यांना दोनदा हार्ट अटॅक आला होता शिवाय त्यांच्यावर बायपास सर्जरीही झाली आहे.

रा.वन आणि चेन्नई एक्स्प्रेस या गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते करिम मोरानी यांना कोरोनाव्हायरसवर उपचार घेतल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. शुक्रवारी, त्यांची कोरोना विषाणुची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली. 8 एप्रिल रोजी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर मोरानी यांना मुंबईतील नानावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घरी परतल्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 

  • वैद्यकीय योद्ध्यांचे कौतुक

डिस्चार्ज झाल्यानंतर मोरानी म्हणाले, “देवाच्या कृपेमुळे मी व्यस्थित बरा होऊन आता घरी परतलो आहे. माझ्या दोन वेळा कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून दोन्ही निगेटिव्ह आल्या. नानावटी रुग्णालयात असताना मी प्रचंड अस्वस्थ होतो. मात्र सरकारपासून ते वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्यांपर्यंत प्रत्येक जण त्यांचे काम चोखपणे बजावत आहेत. तुम्ही केलेल्या प्रार्थनेमुळेच मी आज बरा होऊन परत आलो आहे. मात्र पुढील 14 दिवस मी क्वारंटइन राहणार आहे. घरी आल्यावर बरे वाटतंय. सुरक्षित रहा.” 

  • दोन्ही मुलींना झाली होती कोरोनाची लागण

करिम मोरानी यांच्यासह त्यांच्या दोन्ही शाजा आणि झोया यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र योग्य उपचारांनंतर त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. मोरानी कुटुंबात सर्वप्रथम शाजा हिला कोरोनाची लागण झाली होती. ती मार्चच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेहून परतली होती. त्यानंतर तिला कोरोनाची लक्षणे दिसली होती. तर दुसरी लेक झोया मार्च महिन्याच्या दुस-या आठवड्यात राजस्थानहून परतली होती. दोन्ही मुलीनंतर करिम मोरानी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मोरानी हे हार्ट पेशंट आहेत. त्यांना दोनदा हार्ट अटॅक आला होता शिवाय त्यांच्यावर बायपास सर्जरीही झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...