आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रियाला चित्रपटाची ऑफर:तुरुंगात असलेल्या रियाला 'दबंग 3'चा निर्माता निखिल द्विवेदीकडून चित्रपटाची ऑफर, म्हणाला- जेव्हा हे प्रकरण संपेल तेव्हा आपण एकत्र काम करु

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निखिल द्विवेदीने रिया चक्रवर्तीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबीने) अटक केल्यानंतर आता तिची रवानगी थेट भायखळा तुरुंगात झाली आहे. येथे तिला महिलांच्या जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. कोर्टाने तिला 14 दिवसांची कोठडी दिली आहे. रियाने तिचे वकील सतीश मानशिंदे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर आज सुनावणी होणार आहे.

आता बातमी आहे की, अभिनेता आणि निर्माता निखिल द्विवेदीने रिया चक्रवर्तीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. निखिल, रियाच्या सपोर्टमध्ये पुढे आला आहे.

  • 'दबंग 3' चा निर्माता आहे निखिल

'वीरे दी वेडिंग' आणि 'दबंग 3' या चित्रपटांची निर्मिती कऱणा-या निखिलने एक ट्विट करत रियासोबत चित्रपट करणार असल्याचे म्हटले आहे. 'रिया मी तुला ओळखत नाही, मला नाही माहित एक व्यक्ती म्हणून तू नेमकी कशी आहेस. तुला जेवढं वाईट दाखवलं जातंय कदाचित तू तेवढी वाईट नसावी. ज्याप्रकारे तुला दोषी ठरवले जात आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. असा कुठलाही देश वागत नाही. जेव्हा हे सर्व संपेल, तेव्हा मला नक्कीच तुझ्यासोबत काम करायला आवडेल', असे निखिलने म्हटले आहे.

  • या कलाकारांनीही दिला रियाला पाठिंबा

विशेष म्हणजे सध्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी रियाला पाठिंबा दिला आहे. यामध्ये सोनम कपूर, तापसी पन्नू, विद्या बालन, अनुराग कश्यप, शबाना आझमी, फरहान अख्तर, जोया अख्तरसह अनेक सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...