आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:निर्माते राजकुमार कोहली यांचा धाकटा मुलगा रजनीशचे निधन, मूत्रपिंड निकामी झाल्याने मालवली प्राणज्योत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रजनीशला प्रेमाने सर्व गोगी म्हणायचे

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचा लहान मुलगा रजनीश कोहली याचे निधन झाले आहे. रजनीशने मंगळवारी जुहू येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. रजनीश 44 वर्षांचा होता. त्याला इंडस्ट्रीतील फारच कमी लोक ओळखत होते. तो दिव्यांग होता. किडनी निकामी झाल्यामुळे त्याचे निधन झाले.

रजनीशला प्रेमाने सर्व गोगी म्हणायचे

अभिनेता अरमान कोहलीचा धाकटा भाऊ असलेल्या रजनीशला सर्व प्रेमाने गोगी म्हणायचे. अरमानसाठी तो भावापेक्षा मुलासारखा होता. रजनीशची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी अरमानची होती. रजनीशच्या निधनाने अरमानला मोठा धक्का बसला आहे. रजनीश कधीही लाइमलाइटमध्ये नव्हता.

रजनीश बद्दल फक्त जिवलग मित्र आणि नातेवाईकांना माहिती होती. धर्मेंद्र, मिका सिंग आणि सुनील शेट्टी हे काही बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांची रजनीशसोबत भेट झाली होती.

बातम्या आणखी आहेत...