आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Producer Vipul Amrutlal Shah On Working With Vidyut Jammwal: Whether Shooting For The Film Or Not, He Works Hard On Himself Throughout The Year

खास बातचीत:विद्युत जामवालसोबत काम करणारे 'सनक'चे निर्माते विपुल अमृतलाल शाह म्हणाले- चित्रपटाचे शूटिंग असो अथवा नसो, तो वर्षभर स्वतःवर मेहनत घेत असतो

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'सनक'साठी घेतलेल्या मेहनतीकरिता विपुल शाह यांनी विद्युत जामवालची केली प्रशंसा!

कनिष्क वर्मा दिग्दर्शित 'सनक- होप अंडर सीज’ हा एक अ‍ॅक्शनने भरलेला एक हॉस्टेज ड्रामा थ्रिलरपट आहे. जगातील सर्वात बड्या अ‍ॅक्शन हिरोंपैकी एक असलेल्या विद्युत जामवाल, बंगाली स्टार रुक्मिणी मैत्रा, चंदन राय सान्याल आणि नेहा धुपिया यांच्या अ‍ॅक्शनने भरलेल्या ट्रेलरची चाहत्यांसह समीक्षक तसेच संपूर्ण चित्रपटसृष्टी प्रचंड कौतुक करत आहे. खासकरुन या चित्रपटासाठी विद्युतने केलेली तयारी ही कौतुक करण्याजोगी आहे. त्यामुळे विपुल शाह यांना देखील विद्युतची प्रशंसा करण्याचा मोह आवरता आला नाही. चित्रपटात विद्युत मध्यवर्ती भूमिकेते आहे.

विद्युत वर्षभर मेहनत घेत असतो

अ‍ॅक्शन दृश्यांचे परिणाम, पद्धती व त्यांच्याकरिता विद्युतच्या सुरु असलेल्या तयारीबदल बोलताना विपुल शाह म्हणाले की, "आम्ही एकत्र जे काही चित्रपट केले आहेत त्याकरिता विद्युत नेहमीच वेगळ्या पद्धतीने तयारी करत असतो. त्याच्याकडे अनेक कल्पना असून त्यावर तो सातत्याने काम करत असतात. अगदी तेव्हाही जेव्हा आम्ही शूटींग करत नसतो किंवा तेव्हाही जेव्हा चित्रपटाची काही योजना नसते. तो आपल्या आगामी चित्रपटातील अ‍ॅक्शनला वेगळ्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी नवनवीन कल्पनांवर वर्षभर काम करत असतो."

विद्युत स्वतःच्या कामावर कधीच संतुष्ट नसतो

विपुल शाह यांंनी पुढे म्हणाले की, "या चित्रपटासाठी आमच्या दोघांचीही अशी इच्छा होती की या चित्रपटातील अ‍ॅक्शन आजवर कधीही हिंदी सिनेमात दाखवण्यात आलेली नसावी. विद्युत ही एक अशी व्यक्ती आहे जी आम्ही जे काही केले किंवा मिळवले त्यावर कधीही संतुष्ट नसते. त्यामुळे आम्ही जेव्हा सनकची योजना आखत होतो तेव्हा तो म्हणाला होता, सर 'कमांडो'च्या पुढे जायचे आहे व आपण त्याच्या पुढे जाऊ. त्याने अ‍ॅँडी लाँगच्या (हॉलिवूड स्टंट कोरिओग्राफर) टीमबरोबर सनकसाठी काय काय तयारी केली होती हे जेव्हा मी पाहिले होते तेव्हा मी थक्क झालो. दिग्दर्शक कनिष्क वर्मा यांचा सुंदर आणि स्पष्ट विचार होता की त्यांना स्क्रीनवर अ‍ॅक्शन दृश्ये कशाप्रकारे पाहण्याची इच्छा आहे, त्यामुळे एका टीमच्या रुपात त्यांनी असे काहीतरी बनवले आहे, जे नक्कीच शानदार, आकर्षक आणि वेगळ्या स्तरावरचे झाले आहे. त्यामुळे विपुल नेहमी जे काही समोर आणतो त्यामुळे मी कायम अचंबित होतो.’

विद्युत जामवाल, चंदन रॉय सान्याल, नेहा धूपिया आणि या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यु करणारी बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा स्टारर 'सनक - होप अंडर सीज' झी स्टूडियोजद्वारे सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडच्या सहयोगाने प्रस्तुत करण्यात येत असून 15 ऑक्टोबरपासून डिज्ने + हॉटस्टार मल्टीप्लेक्सवर स्ट्रीम करेल. हा विपुल अमृतलाल शाह प्रोडक्शनचा चित्रपट असून याचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...