आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाच्या इंडस्ट्रीविरोधी भाष्यांवरून खळबळ:ज्युनिअर आर्टिस्ट आणि वर्कर यूनियन संतापले, म्हणाले  - ती प्रत्येक गोष्टीत अतिशयोक्ती करते

अमित कर्ण, मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • युनियन आणि संघटनांकडून कंगनाच्या भाष्याला विरोध...

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना रनोट सातत्याने ग्लॅमर इंडस्ट्री विरोधात मत व्यक्त करते आहे. नेपोटिझम आणि गटबाजीवरून सातत्याने भाष्य केल्यानंतर आता तिने बॉलिवूडमधील 90 टक्क्यांहून जास्त जण ड्रग्ज घेतात असे म्हटले आहे. या भाष्यामुळे इंडस्ट्रीतील अनेक युनियन आणि असोसिएशन्स नाराज आहेत. सर्वांच्या मते कंगनाचे हे वागणे बरे नव्हे. यामुळे बॉलिवूडची प्रतिमा मलिन होत आहे.

  • गुंतवणूकदार हात आखडता घेतील

निर्मात्यांची सर्वात मोठी संस्था "इम्पा' चे प्रमुख टी.पी. अग्रवाल यांनी याबाबत सांगितले की, "कंगनाच्या अशा वक्तव्यांमुळे बॉलिवूडबाबत वाईट मतप्रवाह लोकांच्या मनात येत आहे. येथे गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदार हात आखडता घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उद्योगातील चित्रपट, वेब शोज आणि मालिका निर्मितीशी संबंधित हजारो कुटुंबांवर याचा थेट परिणाम होईल. नशा करणारे लोक फक्त 10 ते 15 टक्के असतील. मात्र कंगना हे प्रमाणा वाढवून 90 ते 99 टक्के सांगते आहे, हे अत्यंत चुकीचे आहे.

  • ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशन कारवाई करणार

नृत्य करणारे ज्युनियर कलाकार हे ड्रग्जचा पुरवठा करतात, असे सांगणाऱ्या चॅनलवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशन सज्ज झाली आहे. 70 वर्षांपासून असणाऱ्या या असोसिएशनचे उपाध्यक्ष हिमांशू डाभावाला यांनी सांगितले, ‘आमच्या संघटनेत 1400 हून जास्त जण बॅकग्राउंड कलावंत म्हणून काम करतात. काही जण मागील 70 वर्षांपासून काम करताहेत. ड्रग माफियांचे पुरवठादार म्हणून आमचा उल्लेख होत असेल तर आमच्या प्रतिष्ठेला हा कलंक आहे. तुमच्याकडे पुरावे असतील तर दाखवा, अन्यथा आम्ही चॅनलविरोधात कायदेशीर कारवाई करू.’

बातम्या आणखी आहेत...