आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेटवरून थेट माहिती:टायगरच्या ‘गणपत’ चित्रपटासाठी निर्माते बनवतील तीन शहरांचा सेट,  लंडनमध्ये सिल्व्हर सिटी, मुंबईत गॉथम सिटीसारखा सेट उभारणार

अमित कर्ण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनाथ मुलाच्या भूमिकेत टागयर

‘क्वीन’ आणि ‘सुपर 30’ फेम दिग्दर्शक विकास बहल आपल्या कारकिर्दीतील सर्वात महागडा चित्रपट ‘गणपत’ बनवणार आहेत. याची कथा आजपासून 69 वर्षांनी पुढे म्हणजेच 2090 वर आधारित आहे. चित्रपटात त्या काळात मुंबई आणि इतर जग कसे राहील, ते दाखवण्यात येणार आहे. निर्मात्यांनी याचे रफ स्केच जवळजवळ तयार केले आहे. ही माहिती प्रॉडक्शन डिझायनर अमित रे यांनी दिली आहे.

आम्ही यासाठी तीन प्रकारची शहरे उभारली आहेत. एकात गरिबीबरोबरच गुन्हे आणि अराजक असेल. हे शहर काहीसे हॉलिवूड चित्रपट ‘जोकर’मध्ये दाखवण्यात आलेल्या गॉथम सिटीसारखेच असेल. दुसरे शहर भीमताल आहे, जे मध्यमवर्गीय लोकांसाठी असेल आणि तिसरे शहर सिल्व्हर सिटी आहे. त्यात फक्त श्रीमंत लोकच राहतात. चित्रपटात श्रीमंत आणि गरीब लोकांमधील लढाई दाखवण्यात येईल.

अनाथ मुलाच्या भूमिकेत टागयर
'गणपत’ विषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट जगाच्या बऱ्याच देशात शूट होईल. लंडनसह निर्माते याला सिंगापूर आणि नंतर जपानमध्येही शूट करणार आहेत. याचे बजेट सुमारे 200 कोटी ठरवण्यात आलेे. एका वर्षापासून याच्या प्री-प्रॉडक्शनवर काम सुरू आहे. चित्रपटात टायगर अनाथ मुलाच्या भूमिकेत आहे, त्याचा सांभाळ एका फाइट मास्टर करतो. यात कृती सेननदेखील अॅक्शन करताना दिसणार.

'गणपत' नंतर 2022 मध्ये शूट होणार ‘गुडबाय’
‘गणपत’ चित्रपटामुळे विकासने आपल्या दुसऱ्या 'गुडबाय’च्या शेड्यूलमध्ये बदल केला आहे. ते सप्टेंबरपासून ते डिसेंबरपर्यंत 'गणपत’चे शूटिंग करणार आहेत. त्यानंतर ते ‘गुडबाय’वर काम करणार आहेत. सूत्रानुसार, 'गुडबाय’ मध्ये आता फक्त ऋषिकेशच्या एका शेड्यूलचे शूटिंग उरले आहे. ते अमिताभ, रश्मिका आणि इतर लोक शूट करतील.

विखुरलेल्या कुटुंबाला एकत्र आणण्याची कथा
'गुडबाय’मध्येदेखील 'पीकू’ प्रमाणेच बाप-लेकीचे नात्यावर आधारित आहे. मात्र ‘पीकू’मध्ये दीपिकाच्या पात्राने कथा पुढे सरकते. मात्र यात अमिताभ यांच्या पात्रातून कथा सांगण्यात आली. या चित्रपटाचा भार अमिताभ यांच्या खांद्यांवर आहे. ते यात निवृत्त सरकारी अधिकाऱ्याची भूमिका करत आहेत, त्यात त्यांच्या पत्नीचे निधन होते. ते स्वत: चंडीगडमध्ये राहतात. त्यांना दोन मुले आहेत. एक ऑस्ट्रेलिया आणि दुसरा मुंबईत करिअर सेट करण्यात लागला. अमिताभचे पात्र विखुरलेले कुटुंब एकत्र आणते, यावर कथा आधारित आहे. यात रश्मिका मंदन्ना त्यांच्या मुलीच्या भूमिकेत आहे.

बातम्या आणखी आहेत...