आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न फिल्म केस:राज कुंद्रासाठी पॉर्न कंटेंट बनवल्याचा आरोप असलेल्या तनवीर हाशमीचा कबुलीजबाब, म्हणाला- 'आम्ही इरॉटिक चित्रपट बनवायचो, ज्याला सॉफ्ट पॉर्न म्हटले जाऊ शकते'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तनवीर हाशमी म्हणाला - मी माझ्या आयुष्यात राज कुंद्राला कधीच भेटलो नाही

अश्लील चित्रपट प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योजक राज कुंद्रासह बर्‍याच लोकांना अटक झाली आहे. यामध्ये सध्या जामिनावर बाहेर असलेल्या तनवीर हाशमीच्या नावाचाही समावेश आहे. रविवारी मुंबई गुन्हे शाखेने तनवीर हाशमीची सुमारे तीन तास चौकशी केली. यावेळी आपला राज कुंद्राशी थेट संबंध नसल्याचे तनवीर हाशमी म्हणाला. तसेच राज कुंद्रा अश्लील नव्हे तर न्यूड फिल्म बनवायचा असा खुलासा त्याने केला आहे.

मी माझ्या आयुष्यात राज कुंद्राला कधीच भेटलो नाही वृत्तानुसार, तनवीर म्हणाला, 'मला राज कुंद्रा संदर्भात गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. मला विचारले गेले की मी राजला कधी भेटलो का? मात्र मी क्राइम ब्रांचला स्पष्ट केलंय मी आजवर राज कुंद्राला भेटलो नाही.'

आम्ही 20 ते 25s मिनिटांच्या शॉर्ट फिल्म बनवायचो
तनवीरने सांगितल्यानुसार, तो राज कुंद्राच्या अॅपसाठी कंटेंट तयार करायचा, परंतु तो कुंद्राच्या कंपनीत थेट काम करत नव्हता. तनवीरला त्याने कशाप्रकराचा कंटेंट बनवला हे विचारण्यात आले होते. यावर तो म्हणाला, 'आम्ही 20-25 मिनिटांच्या शॉर्ट फिल्म बनवायचो. ज्यात न्यूडिटी होती मात्र तुम्ही त्याला अश्लील नाही म्हणू शकतं. हे सॉफ्ट पॉर्न चित्रपट होते असे आपण म्हणू शकतो.'

कुंद्राच्या कंपनीचे 4 कर्मचारी साक्षीदार झाले
राज कुंद्राच्या अडचणी आणखीनच वाढणार आहेत. कारण सूत्रांच्या माहितीनुसार, राज कुंद्राच्या कंपनीतील चार कर्मचाऱ्यांनी त्याच्याविरोधात साक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा तनवीरला विचारले की तो देखील साक्षीदार होणार आहे का? यावर तो म्हणाला, 'मी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे साक्षीदार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आज त्यांनी (गुन्हे शाखा) मला राज कुंद्रा संदर्भात प्रश्न विचारले आणि मी त्यांना आवश्यक उत्तरे दिली.'

असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत जे बोल्ड कंटेंट तयार करत आहेत
तनवीर म्हणाला की, तो कोर्टात आपला खटला लढेल. कुंद्राच्या कंपनीने तयार केलेल्या कंटेंटच्या प्रश्नावर तो म्हणाले, 'मी कोणालाही जज करु शकत नाही. कायदा निर्णय घेईल. मी यावर टिप्पणी करू शकत नाही. परंतु एक गोष्ट अशी आहे की, असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत जे बोल्ड कंटेंट तयार करीत आहेत आणि त्यांची चौकशी केली जात नाही.'

बातम्या आणखी आहेत...