आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'तांडव' ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मात्र ही सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या सीरिजद्वारे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला जात आहे. तसेच हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप अनेकांनी केले आहे.
वेब सीरिजच्या एका दृश्यामध्ये मोहम्मद झिशान आयूब नाटकात काम करताना दिसत आहे. त्याने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. दरम्यान तो नाटकामध्ये अपशब्द वापरताना दिसतो. या दृश्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर आता या सीरिजवर बंदी घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे. सोशल मीडिया यूजर्सनंतर आता भाजप नेतेही यावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. कपिल मिश्रा, नरेंद्र कुमार चावला, गौरव गोयल आणि अलवरचे खासदार योगी बालकनाथ यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना टॅग करत वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
शनिवारी सोशल मीडियावर #BanTnadavNow दुसर्या क्रमांकावर ट्रेंड झाला. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत सुमारे 1.65 लाख ट्विट केले गेले होते. या सीरिजमध्ये भगवान राम आणि महादेवाची थट्टा केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्याचबरोबर देशविरोधी अजेंडाला प्रोत्साहन देण्यात आल्याचेही म्हटले गेले आहे.
दिल्ली भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, "तांडव दलितविरोधी आणि हिंदूविरूद्ध जातीय द्वेष पसरवत आहे." यासह त्यांनी आयएनबी मंत्रालयाचा ईमेल आयडी शेअर केला आहे आणि आपल्या फॉलोअर्सना तांडववर बंदी आणण्यासाठी प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिण्याचे आवाहन केले आहे.
दिल्ली भाजपचे नेते नरेंद्र कुमार चावला यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “हा ट्रेंड पाहून मीसुद्धा तांडववर बंदी घालण्याची मागणी करतो.”
चंदीगड भाजपचे प्रवक्ते गौरव गोयल यांनी तांडवविरोधात अनेक सोशल मीडिया पोस्ट केले आहेत. त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिले, "यावेळी तांडवच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सोडले जाणार नाही. त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल."
अलवरचे खासदार योगी बालकनाथ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, "मी तांडव वेब मालिकेवर बंदी घालण्याची मागणी करतो."
बिहारचे भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मिथिलेश कुमार तिवारी यांनीही आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "प्रकाश जावडेकर यांनी त्वरित कारवाई करावी आणि 'तांडव' वेब सीरिज बंद करावी असे मी आवाहन करतो."
भाजप नेते हरिओम दुबे यांनी लिहिले, "प्रकाश जावडेकर कृपया तरुणांना चुकीची दिशा दर्शविणारी आणि भारताविरुध्द छुप्या पद्धतीने अजेंडा चालवणारी ही वेब सीरिज थांबवा."
शुक्रवारी वेब सीरिज रिलीज झाली
सैफ अली खान, डिंपल कपाडिया, मोहम्मद झिशान आयूब, सुनील ग्रोव्हर आणि कृतिका कामरा या कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेली ‘तांडव’ ही वेब सीरिज शुक्रवारी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाली आहे. सोशल मीडियावर या वेब सीरिजमधील एक सीन व्हायरल होतोय. पहिल्या 15 मिनिटांमध्ये अभिनेता झिशान आयुब हा एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अपेक्षा करणारा तरुण भगवान शिवशंकराच्या भूमिकेत वावरताना दिसतोय. त्याने यावेळी काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.