आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पोन्नियन सेल्वन-1'चा ट्रेलर रिलीज:नंदनीच्या भूमिकेत ऐश्वर्या, चोल सामाज्याची शक्ती आणि संघर्षावर आधारित कथानक

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मणिरत्नम यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पोन्नियन सेल्वन-1 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची कथा ही 10 व्या शतकात दक्षिण भारतावर राज्य करणाऱ्या चोल सामाज्याची शक्ती आणि संघर्ष यावर आधारित आहे. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार चियान विक्रम आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय क्रिती, जयराम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपा या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मणिरत्नम यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे संगीत ए आर रहमान यांनी दिले आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

‘पोन्नियन सेल्वन’चा हा चित्रपट 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला होता. हिंदी टिझर अभिनेता अमिताभ बच्चन, मल्याळम टिझर मोहनलाल, कन्नड टिझर रक्षित शेट्टी, तामिळ टिझर सूर्या आणि तेलुगू टिझर महेश बाबू यांनी लाँच केला होता. या चित्रपटाचे बजेट 500 कोटी रुपये असून हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...