आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रीम प्रोजेक्ट:राजेश खन्नांच्या बायोपिकमध्ये काम करु इच्छितो पुलकित सम्राट, एकाच दिवशी वाढदिवस असण्यासोबतच आणखीही आहेत रंजक कारणे 

मुंबई (अमित कर्ण)9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुलकित सम्राटचा आगामी चित्रपट 'हाथी मेरे साथी' हा आहे.

दीर्घ काळानंतर सोमवारी 8 जून रोजी देशात अनलॉक 1 चा टप्पा सुरु झाला आहे. अनेक सेलिब्रिटी याकाळात आता घराबाहेर पडू लागले आहेत. यानिमित्ताने अभिनेता पुलकित सम्राटने लॉकडाऊनचा अनुभव आणि आगामी ड्रीम प्रोजेक्टविषयी दिव्य मराठीसोबत खास बातचीत केली.

  • लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनात कोणता बदल झाला आहे?

लॉकडाऊनने आपल्या सगळ्यांना कुंभकर्ण बनले आहे. सुरुवातीला मला वाटले होते की घरी राहणे फार कठीण जाईल. कारण शूटिंगच्या दिवसांमध्ये आपण बरेच बिझी असतो. जीवन मंदावेल, असा विचार कधी स्वप्नातही केला नव्हता. गेल्या दीड वर्षांबद्दल सांगायचे म्हणजे, कामात बिझी असल्याने मला घरी थांबता आले नव्हते,  मी माझ्या वैयक्तिक आनंदासाठी काही गोष्टी  करू शकलो नव्हतो. पण लॉकडाऊनच्या काळात मी गिटार आणि पियानो शिकलो.

  • शेवटचा चित्रपट कोणता होता, ज्याची शूटिंग नेहमी लक्षात राहील?

'हाथी मेरे साथी' हा चित्रपट. जर लॉकडाऊन झाले नसते तर हा चित्रपट आतापर्यंत प्रदर्शित झाला असता. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला वनजीवनाकडे बारकाईने पाहता आले.  आम्ही जंगलात जाऊन चित्रीकरण केले आहे. दररोज संध्याकाळी 5 वाजता हत्तींचा कळप येत असल्याची सुचना आम्हाला मिळायची. ही सूचना मिळताच सगळे झटपट पॅकअप करायचे. मी माझ्या आयुष्यात फक्त 10 मिनिटांत शेकडो लोकांचा क्रू त्यांचे संपूर्ण सेटअप घेऊन एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी गेल्याचे पाहिले नव्हते. या चित्रपटाच्या काळात असे घडले. संपूर्ण टीम अवघ्या 10 मिनिटांत एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहोचायची.

  • हा चित्रपट खर्‍या वनरक्षकावर आधारित आहे?

होय, ही एका 55 वर्षांच्या माणसाची कहाणी आहे, ज्याने आपल्या आयुष्याची अनेक वर्षे देऊन लाखो झाडे लावली. खरं सांगायचं, आपण मानवांनी प्राण्यांच्या जीवनात घुसखोरी केली आहे.

  • शूटिंग कधीपासून सुरु होणार आहे ?

मला वाटते की, सध्या याला वेळ लागेल. लॉकडाऊनच्या कालावधीत, जसे आपण पाहिले की, कठोर नियम असूनही लोकांनी त्याचे पूर्ण पालन केले नाही. मला वाटते आपण किराणा घेणार असाल तर कुटुंबातील एकाच व्यक्तीने जायला हवे. दुकानांमध्ये जी मार्किंग केली आहेत, तेथून सामान खरेदी करायला हवे. जेव्हा काही लोकांनी डॉक्टरांवर दगडफेक केल्याचे ऐकले तेव्हा खूप दु: ख झाले. आता मला आशा आहे की लोकांच्या वृत्तीत काही सुधारणा झाली असावी.

  • मुंबईत तुम्ही कोणत्या लोकांशी सतत संपर्कात आहात?

निरंजनसोबच व्हिडीओ कॉलवर बोलणे व्हायचे. अली फजलसोबतही व्हिडीओ कॉलवर बोलायचो. लॉकडाऊननंतर आता आपल्या सगळ्यांच्या गाठीभेटी आणि गप्पा गोष्टी सर्वकाही बदलणार आहेत.

  • कुठल्या व्यक्तीची बायोपिक करायला आवडेल?

एक रंजक गोष्ट सांगतो. माझा आणि राजेश खन्ना यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 29 डिसेंबर रोजी दिवशी आहे. मी 'हाथी मेरे साथी' या चित्रपटात जे पात्र साकारले आहे, ते जुन्या चित्रपटातील राजेश खन्नांच्या व्यक्तिरेखेसारखेच आहे. मला जर कधी रुपेरी पडद्यावर राजेश खन्नांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, तर ती माझ्यासाठी खूप नशिबाची आणि अभिमानाची गोष्ट असेल, कारण सुपरस्टार हा शब्द भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वप्रथम त्यांच्यासाठी तयार झाला होता. त्यांच्या आधी आपल्या इंडस्ट्रीमध्ये कुणीही सुपरस्टार नव्हता.

बातम्या आणखी आहेत...