आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरस्टारची बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी:पुनीत राजकुमार यांच्या अंत्यदर्शासाठी पोहोचले होते 30 लाख चाहते, समाजकार्यात होते अग्रेसर

अरुणिमा शुक्ला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार हयात असते तर आज त्यांनी आपला 49 वा वाढदिवस साजरा केला असता. पुनीत यांचे 29 ऑक्टोबर 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूची बातमी पसरताच सरकारने संपूर्ण बंगळुरू शहरात कलम 144 लागू केले आणि दोन दिवस दारूविक्री बंद केली. पुनीत यांचे पार्थिव जिथे ठेवण्यात आले होते तिथे जवळपास 30 लाख लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जमले होते. अखेरच्या दर्शनासाठी चाहत्यांच्या अनेक किलोमीटरच्या लांब रांगा लागल्या होत्या. तर पुनीत यांच्या मृत्यूच्या धक्क्याने 10 चाहत्यांचा मृत्यू झाला, यापैकी काहींनी आत्महत्या केली तर काहींचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

संपूर्ण कन्नड चित्रपटसृष्टीत अशी होती पुनीत राजकुमार यांची क्रेझ... ते सुपरस्टार राजकुमार यांचे धाकटे चिरंजीव होते. त्यांचे 14 चित्रपट सलग 100 दिवस थिएटरमध्ये चालले होते. ते कन्नडमधील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. पुनीत यांची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ केवळ त्यांच्या अभिनयामुळेच नव्हती. तर खऱ्या आयुष्यातही ते मोठ्या मनाचे होते. 26 अनाथाश्रम आणि गरीब मुलांसाठी 56 मोफत शाळा ते चालवत होते.

पुनीत यांनी नेत्रदान केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर, संपूर्ण कर्नाटकातील 1 लाख लोकांनी नेत्रदानाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कर्नाटकात नेत्रदानाचा आकडा अचानक अनेक पटींनी वाढला होता.

निधनानंतर पुनीत राजकुमार यांचा हा दुसरा वाढदिवस आहे. वाचा त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक किस्से आणि चाहत्यांमध्ये असलेली त्यांची क्रेझ-

6 महिन्यांचे असताना मोठ्या पडद्यावर दिसले, शाळाही सोडली
पुनीत राजकुमार यांचा जन्म 17 मार्च 1975 रोजी सुपरस्टार डॉ. राजकुमार आणि निर्मात्या पर्वतम्मा राजकुमार यांच्या घरी झाला. पाच भावंडांमध्ये ते सर्वात लहान होते. वयाच्या अवघ्या 6 महिन्यांत ते प्रेमदा कनिके या चित्रपटात दिसले होते.

धाकटा पुनीत त्याची बहीण पौर्णिमासोबत चित्रपटाच्या सेटवर यायचा. त्यामुळे बालपणापासून पुनीत यांना चित्रपटांमध्ये रस वाटू लागला. या कारणास्तव त्यांनी लहान वयातच शाळा सोडली. मात्र, नंतर त्यांनी होम ट्यूटरच्या मदतीने शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमाही केला. अनेक चित्रपटांमध्ये ते बालकलाकार म्हणून झळकले.

वयाच्या 10 व्या वर्षी मिळाला होता पहिला राष्ट्रीय पुरस्कार
पुनीत राजकुमार 10 वर्षांचे असताना त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 'बेट्टाडा हुवू' या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. या चित्रपटात ते बालकलाकाराच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार, तीन साऊथ फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कारही मिळाले होते.

हे पोस्टर अप्पू या चित्रपटाचे आहे, या चित्रपटातून पुनीत यांनी 2002 मध्ये लीड अॅक्टर म्हणून पदार्पण केले होते. त्यामुळे चाहते त्यांना अप्पू म्हणत.
हे पोस्टर अप्पू या चित्रपटाचे आहे, या चित्रपटातून पुनीत यांनी 2002 मध्ये लीड अॅक्टर म्हणून पदार्पण केले होते. त्यामुळे चाहते त्यांना अप्पू म्हणत.

पुनीत एक गायक आणि टीव्ही प्रेझेंटर देखील होते
पुनीत केवळ अभिनेताच नाही तर गायक आणि टीव्ही प्रेझेंटरही होते. ‘आकस्मिक’ या चित्रपटासाठी त्यांनी कॉश्च्युम डिझाइन केले होते. पुनीत यांना स्टेडिकॅमची माहिती होती. स्टेडिकॅमचा वापर चित्रपटांमध्ये स्टंट आणि कार चेस यांसारख्या दृश्यांना शूट करण्यासाठी केला जातो.

त्यांना नवीन ब्रँडचे कॅमेरे आणि चित्रपटांसाठी हाय डेफिनेशन लेन्सबद्दल शिकणे देखील आवडायचे. त्यांनी दोन टीव्ही शोची निर्मितीही केली होती.

पुनीत अनेक ब्रँड एंडोर्समेंटचा भाग होता
पुनीत हा एफस्क्वायर, मालाबार गोल्ड, मनप्पुरमचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होते. ते कर्नाटक दूध महासंघ 'नंदिनी'चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर देखील होते. पुनीत यांनी यासाठी कोणतेही मानधन घेतले नाही. 2008 आणि 2009 मध्ये ते IPL संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होते.

पुनीत यांच्या वडिलांचे वीरप्पनने केले होते अपहरण
ही गोष्ट 2000 सालची आहे. चंदन तस्कर वीरप्पन याने पुनीत राजकुमार यांचे वडील राजकुमार यांचे अपहरण केले होते. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राजकुमार यांची सुटका करण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले होते. सुमारे 108 दिवसांनंतर वीरप्पन आणि सरकारमध्ये एक करार झाला, त्यानंतर राजकुमार यांची तेथून सुखरूप सुटका करण्यात आली.

राजकुमार हे कन्नड चित्रपटसृष्टीचे आयकॉन मानले जायचे. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित होणारे ते पहिले कन्नड अभिनेते होते. पुनीत यांचे वडील राजकुमार यांनीही 1994 मध्ये नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला होता. 2006 मध्ये त्यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

सँडलवूडचे असे एक अभिनेते ज्यांचे 14 चित्रपट चित्रपटगृहांत 100 दिवस चालले

पुनीत हे सँडलवूड इंडस्ट्रीतील असे एक अभिनेते होते, ज्यांचे 14 चित्रपट जवळपास 100 दिवस थिएटरमध्ये चालले. ते कन्नड चित्रपटातील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार होते. एका चित्रपटासाठी ते 2-3 कोटी रुपये घेत असे. तर ब्रँड एंडोर्समेंटसाठी ते 1 कोटी रुपये घेत असे.

कर्नाटक सरकारने 1 नोव्हेंबर 2022 रोजी पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर कर्नाटक रत्न हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.
कर्नाटक सरकारने 1 नोव्हेंबर 2022 रोजी पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर कर्नाटक रत्न हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.

पुनीत आणि त्यांचे औदार्य
2019 मध्ये उत्तर कर्नाटकात पूर आला होता. पुनीत राजकुमार या कठीण काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे आले होते. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला 5 लाख रुपये दिले होते. जेव्हा देश कोरोना महामारीशी झुंज देत होता, तेव्हा त्यांनी कर्नाटक सरकारच्या मदत निधीसाठी 50 लाख रुपये दिले होते.

पुनीत 46 मोफत शाळा, 26 अनाथाश्रम, 16 वृद्धाश्रम आणि 19 गोशाळा चालवायचे. याशिवाय अनेक कन्नड भाषिक शाळांनाही ते आर्थिक मदत करत असत.

आईसोबत मिळून मुलींसाठी आश्रम चालवत होते
पुनीतच्या यांना त्यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या आईनेही पूर्ण सहकार्य केले. ते त्यांच्या आईसोबत मिळून म्हैसूरमध्ये शक्तीधाम नावाचा आश्रम चालवत होते. तिथे त्यांनी हजारो मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलला होता.

ही एक सेवाभावी संस्था आहे. बलात्कार पीडितांना मदत, मानवी तस्करीविरोधात मोहीम, वेश्याव्यवसायाच्या विरोधात ही संस्था काम करते.

शाळकरी मुलांनी 1.90 कोटी खर्चून पुनीत राजकुमार यांच्या नावाने बनवला उपग्रह
पुनीत राजकुमार यांच्या निधनानंतर बंगळुरूमधील एका सरकारी शाळेतील मुलांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा अनोखा मार्ग अवलंबला होता. मुलांनी पुनीत यांच्या नावाने सॅटेलाइट बनवला होता. कर्नाटक सरकारच्या मंत्र्यांनी ही माहिती दिली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बंगळुरूमधील सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांनी 1.90 कोटी रुपये खर्चून KGS3 उपग्रह विकसित केला होता.

पुनीत हे पीआरके ऑडिओ या संगीत लेबलचे संस्थापक आणि मालक होते. 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत, या चॅनेलचे YouTube वर 15.1 लाख यूजर होते.
पुनीत हे पीआरके ऑडिओ या संगीत लेबलचे संस्थापक आणि मालक होते. 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत, या चॅनेलचे YouTube वर 15.1 लाख यूजर होते.

वयाच्या 46 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन
29 ऑक्टोबर 2021... पुनीत राजकुमार जीममध्ये वर्कआउट करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी ही गोष्ट पत्नी अश्विनीला सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना जवळच्या विक्रम रुग्णालयात दाखल केले. पुनीत आजारी असल्याची बातमी समजताच रुग्णालयासमोर लोकांनी गर्दी जमली आणि त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी चाहते प्रार्थना करु लागले. काही वेळाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताने संपूर्ण कर्नाटकात खळबळ उडाली.

दंगल होऊ नये, म्हणून 2 दिवस दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली
बंगळुरूमधील अनेक चित्रपटगृहे दिवसभर बंद राहिली आणि शहरात चित्रपटांच्या प्रमोशनवरही बंदी घालण्यात आली. पुनीत राजकुमार यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर शहरातील अनेक प्रसिद्ध पबही बंद करण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून बंगळुरूमध्ये दोन रात्री दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली होती. आयटी कंपन्यांसह अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लवकर घरी पाठवले होते.

अखेरचा निरोप द्यायला पोहोचले होते 30 लाख लोक
पुनीत राजकुमार यांचे पार्थिव चाहत्यांना दर्शनासाठी 2 दिवस बंगळुरू येथील कांतीरवा स्टेडियममध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्य दर्शनासाठी 30 लाखांहून अधिक लोक पोहोचले होते. भारतीय इतिहासातील हा सर्वात मोठा अंत्यसंस्कार होता. या गर्दीतील लोक रडून रडून बेहाल झालेले दिसले.​​​​​

चाहत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंगळुरूमध्ये कलम 144 लावण्यात आली होती. स्टेडियमबाहेर जमलेल्या गर्दीमुळे विठ्ठल माल्या रोडवरून कोणतेही वाहन जाऊ शकले नाही. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते.

दरम्यान, सुपरस्टारच्या निधनाची बातमी ऐकून एका चाहत्याने आत्महत्या केल्याचे वृत्त आले होते. तर दुसरीकडे 2 जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. काही दिवसांनी आत्महत्या आणि हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या मृत्यूचा हा आकडा 10 वर पोहोचला होता.

  • कर्नाटकातील बेलगामी जिल्ह्यातील अथणी येथे राहणारा राहुल गादिवादारा पुनीत राजकुमारची देवाप्रमाणे पूजा करत असे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांना मोठा धक्का बसला. त्याने आधी दिवंगत पुनीत यांच्या फोटो फुलांचा हार घातला आणि त्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली.
  • याच बेलगामी जिल्ह्यातील शिंदोली गावात राहणारे परशुराम देवम्मनवार हे पुनीत राजकुमारचे खूप मोठे चाहते होते आणि टीव्हीवर अभिनेत्याच्या हृदयविकाराच्या झटक्याची बातमी ऐकून ते खूप दुःखी झाले. ते दिवसभर रडत होते. त्यानंतर पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी येताच ते जमिनीवर कोसळला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
  • कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील मरूर गावातील मुनियप्पा यांनाही त्यांच्या सुपरस्टारच्या निधनाच्या बातमीने खूप दुःख झाले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच ते जोरजोरात रडू लागले. त्यांची प्रकृती इतकी बिघडली की, त्यांना छातीत वेदना होऊ लागल्या आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पुनीत यांच्या पोस्टरला मिठी मारून वृद्ध महिला रडू लागली
यादरम्यान आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला पुनित राजकुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पोस्टरला मिठी मारून रडताना दिसली होती. एका बसवर त्यांचे पोस्टर चिकटवण्यात आले होते, ज्यामध्ये ते हसताना दिसत होते. महिलेने स्वतःच्या हाताने पोस्टरवरील धूळ स्वच्छ केली होती.

ती पुनीतच्या चेहर्‍याला खरच स्पर्श करत असल्यासारखी मिठी मारत होती. पुनीतचा फोटो पाहून तिला अश्रू आवरता आले नाहीत. हा व्हिडिओ विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केला आहे.

पुनीत यांना कर्नाटकच्या महान सुपुत्राचा दर्जा मिळाला.
पुनीत यांना कर्नाटकच्या महान सुपुत्राचा दर्जा मिळाला.

फॅनने मृत्यूला संशयास्पद सांगत केली होती चौकशीची मागणी
चाहत्यांची ही क्रेझ इथेच थांबली नाही. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करत एका चाहत्याने पोलिस ठाण्यात तक्रार केल्याचेही वृत्त समोर आले होते. अरुण नावाच्या या व्यक्तीने आपल्या तक्रारीत पुनीत पूर्णपणे ठीक होते असे लिहिले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले नाही, अशा आरोप या चाहत्याने केला होता. पोलिसांनी तक्रार स्वीकारली आणि तपास केला, परंतु कोणतेही महत्त्वपूर्ण पुरावे सापडले नाहीत.

पुनीत यांच्याप्रमाणेच एक लाख चाहत्यांनी नेत्रदानासाठी नाव नोंदणी केली होती
पुनीत राजकुमार यांनी जिवंत असतानाच नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे डोळे रुग्णालयात दान करण्यात आले. त्यावेळी त्यांचे चाहते नेत्रदान करण्यासाठी बंगळुरू शहरातील नारायण नेत्रालय रुग्णालयात पोहोचले होते. वृत्तानुसार, सुमारे एक लाख चाहत्यांनी त्यांची नावे नोंदवली होती.

1500 लोकांनी केली होती हृदयाची तपासणी
जेव्हा लोकांना समजले की, पुनीत राजकुमार यांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा सुमारे 1500 लोकांनी स्वतःची ईसीजी करुन घेतली होती. यापैकी बहुतेक लोक जिम वर्कआउट करणारे होते.

पुनीत राजकुमार यांचा शेवटचा चित्रपट 'जेम्स'चे हे पोस्टर आहे. त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 100 कोटींच्या आसपास होते.
पुनीत राजकुमार यांचा शेवटचा चित्रपट 'जेम्स'चे हे पोस्टर आहे. त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 100 कोटींच्या आसपास होते.

पुनीत यांना मिळालेले सन्मान

  • 'बेट्टड हुवू' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार
  • 'अरसू' चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
  • 'राम' चित्रपटासाठी एकेकेए सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
  • 'राज - द शोमन' या साऊथ स्कोप चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
  • म्हैसूर रोडवरील नयनदहल्ली जंक्शन आणि बन्नेरघट्टा रोडवरील वेगा सिटी मॉल दरम्यानच्या बंगळुरू आऊटर रिंग रोडच्या 12 किलोमीटरच्या भागाला डॉ. पुनीत राजकुमार रोड असे नाव देण्यात आले आहे.
  • बेल्लारी येथील बेल्लारी महोत्सवाच्या उद्घाटनावेळी पुण्यात 23 फूट उंच पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...