आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नड स्टारला मिळणार कर्नाटक रत्न पुरस्कार:पुनीत राजकुमार यांना राज्य सरकारकडून मरणोत्तर करण्यात येणार सन्मानित

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सामाजिक कार्यातही पुढे होते पुनीत

कर्नाटक सरकार दिवंगत कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर कर्नाटक रत्न पुरस्कार प्रदान करणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. पुनीत यांना हा सन्मान 1 नोव्हेंबर रोजी कन्नड राज्योत्सवाच्या कार्यक्रमात देण्यात येणार आहे.

राज्याच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित होणारे पुनीत हे दहावे व्यक्ती आहेत. यापूर्वी डॉक्टर वीरेंद्र हेगडे यांना 13 वर्षांपूर्वी म्हणजेच 2009 मध्ये समाजसेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. 1992 मध्ये पुनीत यांचे वडील डॉ. राजकुमार यांनाही या सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते, त्यांच्यासोबत कवी कुवेंपू यांनाही सन्मानित करण्यात आले होते.

सामाजिक कार्यातही पुढे होते पुनीत
46 वर्षांच्या आपल्या अल्पशा आयुष्यात पुनीत सामाजिक कार्यातही अग्रसेत होते. कोरोना महामारीच्या काळात पुनीत यांनी मुख्यमंत्री मदत निधीला 50 लाख रुपये दिले होते. याशिवाय त्यांनी 45 शाळा, 26 अनाथाश्रम, 16 वृद्धाश्रम, 19 गोशाळा आणि 1800 अनाथ मुलींच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी उचलली होती.

हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता मृत्यू
पुनीत राजकुमार यांचे गेल्या वर्षी 29 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी अश्विनी रेवंत आणि दोन मुली धृती आणि वंदिता असा परिवार आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट 'जेम्स' यावर्षी 17 मार्च रोजी रिलीज झाला, ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग केली.

पुनीत यांचा चित्रपट प्रवास
पुनीत यांचे वडील राजकुमार हे दक्षिणेतील आयकॉन होते. पुनीत यांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 'बेट्टाड हूवू' या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'अप्पू' या चित्रपटातून त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली. आकाश (2005), आरसू (2007), मिलन (2007) आणि वंशी (2008) यांसारख्या चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठी ते ओळखला जातात, हे त्यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे व्यावसायिक हिट आहेत. दक्षिणेत त्यांच्या चित्रपटांची इतकी क्रेझ होती की एकदा त्यांचे 14 चित्रपट सलग 100 दिवस थिएटरमध्ये चालले होते.

बातम्या आणखी आहेत...