आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयविकाराची भिती:सुपरस्टार पुनीत राजकुमार याचे हृदयविकाराने निधनानंतर जनतेत भीतीचे वातावरण, हृदयरोग उपचार घेण्यासाठी रुग्णालयात लांबच लांब रांगा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता पुनीत राजकुमार याचा 29 ऑक्टोंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. हृदय विकाराचा झटका आल्या-आल्या पुनीत याला बंगळुरूच्या विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. हृदयविकाराच्या झटक्याने पुनीत यांचे मृत्यू झाल्यानंतर लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे अनेक जण आपल्या शरिराची तपासणी करण्यासाठी रुग्णालयात जातांना पाहायला मिळत आहे. रिपोर्ट्स नुसार, कर्नाटकातील जवळजवळ सर्व हृदयरोग निदान आणि उपचार रुग्णालये तसेच तपासणी केंद्रांमध्ये लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

बंगळुरूच्या 'श्री जयदेव इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोवस्कुलर रिसर्च सेंटर'मध्ये पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आहे. येथे प्रत्येक जण आपल्या हृद्याच्या तपासणीसाठी आलेला असून, प्रत्येकाला आपला हृदयाबद्दल जाणून घ्यायचे आहे. याच हॉस्पिटलमध्ये एका 46 वर्षीय रुग्णाचे छातीत दुखत असल्याने तो आपल्या काकांच्या सोबत आला होता.

त्याला असे वाटत आहे की, आपल्याला हृदयविकाराचे आजार होणार आहे. त्याने रुग्णाने डॉक्टरांना सांगितले की, "पुनीत राजकुमार सरच्या मृत्यूनंतर मी कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ इच्छित नाही. त्यामुळे मी सुमारे 180 किलोमीटर प्रवास करून हॉस्पिटलमध्ये तपासणी करायला आलो आहे."

रोजाना सुमारे 1800 रुग्ण येत आहेत
पुनीत राजकुमार याचे हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक रुग्णालयात येऊन आपल्या हृदयाची तपासणी करतांना पाहायला मिळत आहे. श्री जयदेव इंस्टीट्यूटच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, "मागील तीन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत आहे. आम्ही रोज सुमारे 1000 जणांना उपचार देत आहोत, मात्र आता पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली असून, सुमारे 1800 रुग्ण दररोज येत आहेत. त्यामुळे डॉक्टर, नर्स आणि सिस्टम यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे."

जिम बद्दल नकारात्मकता पसरली
पुनीत राजकुमार हा दरोरज जीम मारायचा त्या दिवशीदेखील त्याने घरी जीम मारले त्यानंतर काही मिनीटांमध्येच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे लोकांच्या मनात जीमबद्दल नकारात्मकता पसरल्याचे पाहायला मिळत आहे. लोकांना असे वाटत आहे की, आपल्याला देखील जीम मारतांना झटका येऊ शकतो. त्यामुळे लोकांनी जीमपासून पाठ फिरवली आहे.

बातम्या आणखी आहेत...