आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबी चित्रटसृष्टीसाठी वाईट बातमी::अभिनेते-दिग्दर्शक सुखजिंदर शेरा यांचे निधन; युगांडामध्ये घेतला अखेरचा श्वास, न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात होते दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'यारी जट्ट दी' आणि 'जट्ट ते जमीन शेरा' या सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकले, सध्या 'यार बेली' चित्रपटाचे शूटिंग सुरु होते

पंजाबी चित्रपटसृष्टीसाठी बुधवारी एक दुःखद बातमी आली. प्रसिद्ध पंजाबी अभिनेते आणि दिग्दर्शक सुखजिंदर शेरा यांचे बुधवारी पहाटे युगांडामध्ये निधन झाले. त्यांचे पार्थिव शरीर भारतात आणण्यासाठी नातेवाईक केंद्र सरकारशी संपर्क साधत आहेत. त्यांचे अंत्यविधी पंजाबमध्ये व्हावे, अशी शेरा यांच्या कुटुंबाची इच्छा आहे, पण कोविड -19 मुळे बर्‍याच अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे.

शेरा हे लुधियानामधील जगरावमधील मलकपूर येथील रहिवासी होते. 17 एप्रिल रोजी शेरा दक्षिण आफ्रिकेतील केनिया येथे आपल्या मित्राकडे गेले होते. तेथे त्यांना 25 एप्रिलला ताप आला होता. त्यानंतर त्यांना निमोनिया झाला आणि त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु बुधवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेरा यांनी अनेक पंजाबी चित्रपटांत काम केले होते. 'यारी जट्ट दी' आणि 'जट्ट ते जमीन शेरा' हे त्यांचे सुपरहिट चित्रपट होते. सध्या त्यांच्या 'यार बेली' या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते.

बातम्या आणखी आहेत...