आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Pushpa Star Allu Arjun Lands In Legal Trouble For Violating Traffic Rules In Hyderabad, Gets Challan From Police For Blacked Out Windows

सुपरस्टार कायदेशीर अडचणीत:'पुष्पराज' अल्लू अर्जुनने खऱ्या आयुष्यात तोडले वाहतुकीचे नियम, हैदराबाद पोलिसांनी पकडले आणि दंडही ठोठावला

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अल्लू अर्जुनला भरावा लागला 700 रुपये दंड

तुम्ही दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला त्याच्या गाजलेल्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटात अनेक कायदे तोडताना पाहिले आहे, पण प्रेक्षकांच्या या पुष्पराजने ख-या आयुष्यातही एक कायदा मोडला, त्यामुळे तो कायदेशीर अडचणीत सापडला. रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनने नुकतेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यानंतर त्याला हैदराबाद पोलिसांनी पकडले आणि दंडही ठोठावण्यात आला.

अल्लू अर्जुनला भरावा लागला 700 रुपये दंड
रिपोर्टनुसार अल्लू अर्जुनला वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल दंड भरावा लागला आहे. हैदराबाद पोलिसांनी त्याच्या लँड रोव्हर रेंज रोव्हर लक्झरी एसयूव्ही कार या वाहनाचे चालन कापले आणि अभिनेत्याला 700 रुपये दंड भरावा लागला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काळ्या काचा असलेल्या कारमध्ये स्वार असलेल्या अल्लू अर्जुनला पोलिसांनी हैदराबादमधील बिझी सेंटरजवळ अडवले. कारण अशा काचेच्या खिडक्यांना भारतात बंदी आहे. असे असूनही अनेक सेलिब्रिटी कारला काळ्या काचांचा वापर वापर करतात. पण, सेलिब्रिटींकडे पोलिस दुर्लक्ष करत नाहीत. सामान्य असो की सेलिब्रिटी हैदराबाद पोलीस प्रत्येकाचे सारखेच चालान कापतात.

अल्लू अर्जुनपूर्वी ज्युनियर एनटीआरसह अनेक सेलिब्रिटींनी तोडले होते वाहतुकीचे नियम
अल्लू अर्जुनच्या आधी ज्युनियर एनटीआर, तेलुगु डायरेक्टर त्रिविक्रम श्रीनिवास, कल्याण राम आणि मांचू मनोज यांनाही हैदराबाद ट्रॅफिक पोलिसांनी त्यांच्या गाडीच्या काळ्या काचामुळे रस्त्यात अडवले आणि नियम तोडल्याबद्दल त्यांना दंड ठोठावत चालनही कापले होते. प्रत्येकाला त्याची किंमत मोजावी लागली होती.

गेल्या वर्षी 17 डिसेंबरला रिलीज झाला होता 'पुष्पा'

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' हा चित्रपट गेल्या वर्षी 17 डिसेंबर 2020 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ब्लॉकबस्टर हिट ठरला आणि त्यातील गाणीही खूप लोकप्रिय झाली. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त या चित्रपटात रश्मिका मंदाना, फहाद फासिल आणि सामंथा रुथ प्रभू हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.

बातम्या आणखी आहेत...