आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवूडला आणखी एक धक्का:'प्यार तूने क्या किया' आणि 'रोड' चे दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे निधन, प्रदीर्घ आजारानंतर जयपूरमध्ये घेतला अखेरचा श्वास

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2020 मध्ये आतापर्यंत इंडस्ट्रीने इरफान खान, ऋषि कपूर आणि सुशांत सिंह राजपूतसह अनेक सेलेब्स गमावले

'प्यार तूने क्या किया' आणि 'रोड' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे रविवारी जयपुरमध्ये निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, ते दीर्घकाळापासून अनेक आजारांनी ग्रस्त होते. 'रोड' चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेले मनोज बाजपेयीने रजत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. 

मनोज यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिल की, "माझा मित्र आणि दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे प्रदीर्घ आजारामुळे जयपूरमध्ये निधन झाले. रजत तुमच्या आत्म्याला शांती मिळो. आपल्या कामावर चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा कधीही भेटणार नाही यावर विश्वास बसत शकत नाही. जिथे राहशील तिथे आनंदी राहा."

चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी देखील व्यक्त केले दुःख

चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनीही रजत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "आत्ताच माझ्या मित्राचे निधन झाल्याचे समजले. 'प्यार तूने क्या किया' आणि 'रोड' चित्रपटांचे दिग्दर्शक रजत मुखर्जी मुंबईत आमच्या सुरुवातीच्या स्ट्रगलच्या काळात मित्र होते. आम्ही अनेकदा एकत्र जेवण केले. मला तुझी कायम आठवण येईल प्रिय मित्रा."

7 महिन्यांत इंडस्ट्रीने अनेक सेलेब्स गमावले

मनोरंजन इंडस्ट्रीने गेल्या काही महिन्यांत अनेक लोकप्रिय सेलेब्स गमावले. 25 मार्च रोजी दिग्गज अभिनेत्री निम्मीचे निधन झाले. 29 एप्रिल रोजी इरफान खानने जगाला अलविदा केले. 30 एप्रिल रोजी ऋषि कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. 

1 जून रोजी संगीतकार वाजिद खान आणि 4 जून रोजी दिग्गज चित्रपट दिग्दर्शक बासु चॅटर्जी यांचे निधन झाले. 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. 3 जुलै रोजी कोरिओग्राफर सरोज खान आणि 8 जुलै रोजी विनोदी अभिनेता जगदीप यांनी जगाचा निरोप घेतला.