आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बच्चन कुटुंबियाला कोरोनाचा विळखा:ऐश्वर्या राय आणि आराध्या घरामध्येच होणार क्वारंटाइन, अभिषेक बच्चनने ट्विट करत दिली माहिती, चाहत्यांचे मानले आभार 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमिताभ-अभिषेक बच्चन पॉझिटिव्ह सापडल्यानंतर झाली होती कोरोनाची लागण

बिग बी अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी शनिवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे पुत्र अभिषेक बच्चनलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. यानंतर अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्याचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट आले आहेत. दरम्यान अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन हे दोघं नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. मात्र ऐश्वर्या आणि आराध्या या होम क्वारंटाइन होणार असल्याची माहिती अभिषेक बच्चन यांनी ट्विट करत दिली आहे. 

​​​​​​

अभिषेक बच्चनने ट्विट करत लिहिले की, ऐश्वर्या आणि आराध्या यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार नाही. त्या घरीच होम क्वारंटाइनमध्ये राहतील. मुंबई महापालिकेने सध्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली आहे. ते आवश्यक ती सर्व पावले उचलत आहेत. पुढे अभिषेकने लिहिले की, माझी आई जया बच्चन आणि कुटुंबातील अन्य सदस्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच लवकरात लवकर बरे होण्यासाठी चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्याने आभार मानले आहेत.

0