आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर. बाल्कींचा नवा फॅमिली ड्रामा:आर. बाल्कींच्या आगामी चित्रपटात झळकणार सनी देओल, श्रुती हसनच्या वडिलांची साकारणार भूमिका

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लंडनमधील एका कुटुंबाची कथा यात दाखवण्यात येणार आहे.

सनी देओल सध्या धाकटा मुलगा राजवीरच्या लाँचिंगमध्ये व्यग्र आहेत. त्याचबरोबर ते त्यांच्या ‘अपने 2’ची तयारीदेखील करत आहेत. त्याशिवाय ते आर. बाल्की यांच्या पुढच्या चित्रपटातही दिसू शकतात, अशी बातमी आहे. हा चित्रपट कौटुंबिक नाट्य असणार असून यात सनीसोबत श्रुती हासनसुद्धा दिसणार आहे. श्रुती सनीच्या मुलीची भूमिका साकारत असल्याची चर्चा आहे.

लंडनमधील एका कुटुंबाची कथा यात दाखवण्यात येणार असून यामध्ये पालक आणि त्यांची मुलगी यांच्यातील संबंध दाखवले जाणार आहेत. बाल्की सध्या डुलकर सलमानसोबत चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. तो संपताच ते सनीबरोबर या चित्रपटावर काम सुरू करतील. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात आर. बाल्की सनी आणि श्रुतीसोबत चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जाते.

सनी देओल यांच्या थोरल्या मुलानंतर आता धाकटा करणार बॉलिवूडमध्ये एंट्री
राजश्री प्रॉडक्शन सनी देओल यांचा धाकटा मुलगा राजवीर देओलला बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी सनी यांचा मोठा मुलगा करण देओलने 'पल पल दिल के पास' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट सनी देओल यांनी दिग्दर्शित केला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता.

आजोबा धर्मेंद्र म्हणाले - माझ्या नातवालाही तुमचे प्रेम द्या
अभिनेते धर्मेंद्र यांनीदेखील आपल्या नातवाचा फोटो शेअर करत ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्यांनी लिहिले,‘माझा नातू राजवीर, अवनीश बडजात्यासोबत सिनेमा जगतात प्रवेश करणार आहे. माझ्यावर ज्या प्रकारे जनतेने प्रेम केले त्याच प्रकारे या दोन्ही मुलांनादेखील तसेच प्रेम करावे अशी मी प्रेक्षक माय-बापाला विनंती करतो. शुभेच्छा... देव तुम्हाला सुखी ठेवो...'

बातम्या आणखी आहेत...