आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलीवूड घराणेशाही:आलिया भट्ट आणि रणबीरपेक्षा उत्कृष्ट कलाकार शोधून दाखवा - दिग्दर्शक आर. बाल्की

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमध्ये घराणेशाही आणि गटबाजीवर वाद सुरू आहे

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमध्ये घराणेशाही आणि गटबाजीवर वाद सुरू आहे. येथे सर्वजण आपले मत मांडत आहेत. आता दिग्दर्शक आर. बाल्की यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यामुळे या मुद्द्याला एक नवे वळण लागू शकते. बाल्की म्हणाले, घराणेशाही आणि प्रतिभा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टी आपसात जोडायला नकोत. जे प्रतिभावान नाहीत, त्यांना जनताच स्वीकारणारच नाही. मी ठामपणे म्हणतो की, मला रणबीर कपूर आणि आलियासारखे उत्कृष्ट कलाकार शोधून दाखवा, यानंतर आपण चर्चा करू.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार बाल्की म्हणाले.., घराणेशाही प्रत्येक ठिकाणी आहे यात काही शंका नाही. महिंद्रा, अंबानी, बजाज यांचा विचार करा. त्यांच्या वडिलांनी आपला व्यवसाय त्यांच्या मुलांच्या हातीच सोपवला. याविषयी कोणी म्हणते का, हा व्यवसाय मुकेश अंबानी यांना नव्हे तर इतरांनी चालवायला हवा. नाही ना मग? विशेष म्हणजे समाजाच्या प्रत्येक वर्गात असेच होत असते. एवढेच नव्हे तर एक ड्रायव्हर आणि भाजी विकणारादेखील आपल्या मुलांसाठी व्यवसाय करतो. आपण एका स्वतंत्र समाजात राहतो हे आपल्याला लक्षात घ्यायला हवे.