आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधवनचा 50 वा वाढदिवस:आठवीत नापास झाला होता माधवन, दहावीत द्यावी लागली होती सप्लिमेंट्रीची परीक्षा, जायचे होते आर्मीत पण वय पडले कमी

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2001 मध्ये माधवनने बॉलिवूडमध्ये केले होते पदार्पण

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आर. माधवनचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. माधवनचा जन्म 1 जून 1970 मध्ये जमशेदपूर येथे झाला. तामिळ असलेला माधवन अशा कुटुंबातील आहे, जेथे शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र तरीदेखील माधवनचे लहानपणी अभ्यासात मुळीच लक्ष लागत नव्हते. आठव्या वर्गात तो नापास झाला होता. इतकेच नाही तर दहावीत त्याला सप्लिमेंट्री परीक्षा द्यावी लागली होती.

माधवनला जायचे होते आर्मीत
एका काळ असा होता, जेव्हा फिजिक्स आणि मॅथ्समध्ये कमी मार्क पडल्याने त्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र त्यानंतर माधवनने अभ्यासावर आपले संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आणि कोल्हापूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तेथून त्याने इलेक्ट्रॉनिक्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. इतकेच नाही तर कॅनडामध्ये कल्चरल अॅम्बेसेडर म्हणून भारताचे त्याने प्रतिनिधित्वही केले आहे. त्याला महाराष्ट्र शासनाचा बेस्ट कॅडेट अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. नेवी, आर्मी आणि एअरफोर्समध्ये त्याने ट्रेनिंग घेतेले आहे. माधवनला आर्मीत जायचे होते, मात्र त्यावेळी त्याचे वय सहा महिन्यांनी कमी पडले होते. अभिनय क्षेत्राकडे वळण्यापूर्वी त्याने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेससुद्धा घेतले आहेत.

2001 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण
आर. माधवनने 2001 मध्ये दिग्दर्शक गौतम मेनन यांच्या 'रहना है तेरे दिल में' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. खरं तर यापूर्वी त्याने 1996 मध्ये सुधीर मिश्रा यांच्या 'इस रात की सुबह नहीं' या सिनेमात काम केले होते. मात्र या सिनेमात त्याला क्रेडिट देण्यात आले नव्हते. 2000 मध्ये 'Alaipayuthey' या सिनेमाद्वारे त्याने साउथ इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. बॉलिवूडमध्ये माधवनने आत्तापर्यंत 'रहना है तेरे दिल में', 'रंग दे बसंती', 'रामजी लंदनवाले', '13बी', '3 इडियट्स', 'तनू वेड्स मनू' आणि 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. या प्रत्येक सिनेमातील त्याच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले आहे.

माधवनची फॅमिली
माधवनचे वडील रंगनाथन टाटा स्टीलमध्ये मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून कामाला होते. तर आई सरोजा बँक ऑफ इंडियात मॅनेजरपदी कार्यरत होत्या. माधवनला एक धाकटी बहीण असून देविका हे तिचे नाव आहे. देविका सॉफ्टवेअर इंजिनिअर असून यूकेमध्ये स्थायिक आहे. माधवनने सरिता बिर्जेसोबत 1999 मध्ये लव्ह मॅरेज केले होते. माधवन आणि सरिताला एक मुलगा असून वेदांत माधवन हे त्याचे नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...