आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिमानाचा क्षण:50 वर्षीय आर. माधवनला मिळाली डी लिटची पदवी, एकेकाळी सैन्यात जाण्याची होती इच्छा पण वय होते कमी

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माधवनने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरही ही बातमी शेअर केली आहे.

अभिनेता आर माधवनला डॉक्टर ऑफ लेटर (डी लिट) या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीतर्फे त्याचा हा गौरव करण्यात आला आहे. बुधवारी सोसायटीचा 9 वा दीक्षांत समारंभ झाला. या सोहळ्याला माधवनने हजेरी लावली होती. माधवनने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरही ही बातमी शेअर केली आहे.

अभ्यासात हुशार होता माधवन
माधवनच्या शिक्षणाविषयी सांगायचे म्हणजे, 50 वर्षीय रंगनाथन माधवनने इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीएससी केले आहे. 1988 मध्ये माधवनला कल्चरल अॅम्बेसेडर म्हणून कॅनडामध्ये आपल्या शाळेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. तो ब्रिटिश आर्मी अर्थातच रॉयल नेव्ही आणि रॉयल एअर फोर्ससोबत प्रशिक्षण घेणारा एनसीसीचा कॅडेट होता. माधवनला सैन्यात भरती व्हायचे होते, पण त्यावेळी त्याचे वय सहा महिन्यांनी कमी निघाले होते.

माधवन सध्या इस्त्रोचे माजी वैज्ञानिक नंबी नारायणन यांचा बायोपिक ‘रॉकेट्री द नाम्बी इफेक्ट’च्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये बिझी आहे. यापूर्वी तो अ‍ॅमेझॉन प्राइमच्या 'ब्रीद' या वेब सीरिजमध्ये झळकला होता.

बातम्या आणखी आहेत...