आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्याची प्रतिक्रिया:मीराबाई चानूला जमिनीवर बसून जेवण करताना बघून आर. माधवन म्हणाला - 'हे खरे असू शकत नाही!'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर माधवनने प्रतिक्रिया दिली आहे.

ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगच्या 49 वजनाच्या गटात रौप्य पदक मिळवणारी मीराबाई चानू हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत ती आपल्या घरी जमिनीवर बसून जेवण करताना दिसत आहे. अभिनेता आर माधवनने हा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे.

एका नेटकऱ्याने मीराबाई चानूचा हा फोटो शेअर केला होता. या फोटोत मीराबाई आणखी दोन व्यक्तींसोबत जमिनीवर बसून जेवताना दिसत आहे. 'ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर मीराबाई चानू मणिपूर येथील तिच्या घरी जेवताना दिसतेय. मीराबाईला या गरिबीने तिचे स्वप्न पाहण्यापासून रोखले नाही,' असे कॅप्शन त्या व्यक्तीने दिले होते. तेच ट्वीट रिट्वीट करत आर माधवन म्हणाला, 'हे खरे असू शकत नाही, हे सगळं पाहून आता माझ्याकडे शब्द नाहीत,' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मीराबाईने शेअर केला होता फोटो
या आधी मीराबाईने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटो शेअर केला होता. या फोटोत मीराबाई आणि तिच्या समोर जेवणाचे ताट दिसतं आहे. हा फोटो शेअर करत 'दोन वर्षांनंतर घरचे जेवण मिळते तेव्हा चेहऱ्यावर असा आनंद दिसतो,' अशा आशयाचे कॅप्शन दिले होते.

अनुष्काला आवडले होते इअर रिंग्स
मीराबाईच्या विजयानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरून तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मानेही मीराबाईने सामन्याच्या वेळी घातलेल्या इअर रिंग्सचे कौतुक केले होते. सोन्याचे हे इअर रिंग्स मीराबाईला तिच्या आईने दिले होते, जे ऑलिम्पिक रिंग्जच्या आकाराचे आहेत.

बातम्या आणखी आहेत...