आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता आर. माधवनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. 14 दिवस घरीच क्वारंटाइन राहिल्यानंतर आता त्याच्यासह घरातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. 25 मार्च रोजी माधवनला कोरोनाची लागण झाली होती, तेव्हापासून तो घरात क्वारंटाइन होता.
माधवनसह घरातील सर्व सदस्य झाले कोरोनामुक्त
माधवनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "काळजी आणि प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार. अम्मासह घरातील सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. संक्रमित झाल्यानंतर आम्ही घरातच राहून सर्व प्रोटोकॉल्सचे पालन करत, खबरदारी आणि काळजी घेत आहोत. देवाच्या कृपेने आम्ही सर्वजण फिट आणि बरे आहोत," अशा आशयाची पोस्ट माधवनने शेअर केली आहे.
फरहानला रँचोला फॉलो करायचेच होते
आर. माधवन जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह आला तेव्हा त्याने आमिर खानसोबतचा एक फोटो शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते, "फरहानला रँचोला फॉलो करायचे होते. आणि नेहमीप्रमाणे व्हायरस आमच्या मागे होता. परंतु, या वेळी व्हायरसने आम्हाला पकडले. पण 'ऑल इज वेल' आणि कोविड लवकरच वेल (विहिरीत) असेल. ही एकमेव जागा आहे जिथे आम्हाला राजूने यायला नको आहे. तुमच्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार," असे माधवन म्हणाला होता.
अनेक सेलिब्रिटी अडकले कोरोनाच्या विळख्यात
बॉलिवूडमध्ये कोरोनाचा धोका वाढतच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सेलिब्रिटींना कोरोनाचा संसर्ग झाला. आमिर खान आणि माधवन यांच्यापूर्वी कार्तिक आर्यन, सतीश कौशिक, सिद्धांत चतुर्वेदी, रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, मनोज बाजपेयी, यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.