आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न फिल्म केस:शिल्पा शेट्टीच्या समर्थनार्थ पुढे आला आर. माधवन, म्हणाला- 'तुम्ही या आव्हानातून पूर्ण सन्मानाने बाहेर पडाल अशी मला खात्री आहे'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पाच्या समर्थनात पुढे आले माधवनसह इतर कलाकार

पती राज कुंद्रासह वादात अडकल्यानंतर आता अनेक कलाकार शिल्पा शेट्टीच्या समर्थनात पुढे आले आहेत. यासंदर्भात अभिनेता आर माधवनने मंगळवारी सोशल मीडियावर शिल्पाच्या समर्थनार्थ लिहिले, 'माझ्या ओळखीच्या सर्व लोकांपैकी तुम्ही सर्वात मजबूत लोकांपैकी एक आहात. तुम्ही या आव्हानातून पूर्ण सन्मानाने बाहेर पडाल, अशी मला खात्री आहे. माझ्या प्रार्थना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांसोबत आहेत.' माधवनने शिल्पाच्या त्या पोस्टवर ही टिप्पणी केली ज्यामध्ये अभिनेत्रीने मीडिया ट्रायल करू नये, असे म्हटले होते.

शमितानेही दिला पाठिंबा
शिल्पाची धाकटी बहीण शमिता शेट्टीने देखील आपल्या बहिणीला आधार दिला आहे. 'आय लव्ह यू माय मूनकी, कायम तुझ्यासोबत आहे. प्रत्येक रुपात,' असे शमिता म्हणाली आहे. शिल्पाची बहिण शमिता आणि माधवन व्यतिरिक्त वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिस, दिया मिर्झा, फराह खान, रकुल प्रीत सिंग, हंसल मेहता, अनीता हसनंदानी, माही विज आणि ऋचा चड्ढासह अनेक कलाकारांनी शिल्पाला पाठिंबा दिला आहे.

शिल्पा शेट्टी म्हणाली, आमच्या गोपनीयतेचा सन्मान करावा
पोर्न फिल्म प्रकरणात राज कुंद्राच्या अटकेनंतर प्रथमच शिल्पा शेट्टीचे वक्तव्य समोर आले. शिल्पाने सोशल मीडियावर दोन पांनांची एक नोट पोस्ट करत लिहिले की, 'होय, गेल्या काही दिवस माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी अतिशय आव्हानात्मक आहेत. आमच्यावर अनेक आरोप केले जात आहेत, अफवा पसरवल्या जात आहेत. मीडियाने आणि माझ्या 'हितचिंतकांनी' माझ्याबद्दल अनेक अनावश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. केवळ मीच नाही तर माझ्या कुटुंबालाही ट्रोल केले जात आहे आणि आम्हाला प्रश्न विचारले जात आहेत. मी कोणतीही गोष्ट अजून बोलले नाही आणि या प्रकरणात मी असे करणे टाळत राहणार आहे. कारण हे सगळे न्यायालयीन आहे. त्यामुळे माझे नाव घेऊन कोणतीही खोटी आणि चुकीची विधाने पसरवू नका,' असे शिल्पाने म्हटले आहे.

अर्धवट माहितीवर टिप्पणी करू नका

ती पुढे म्हणाली, 'एक सेलिब्रिटी म्हणून कधीही कोणत्या गोष्टीची तक्रार करु नका, कधीही कोणाला समजावून सांगू नका, या तत्त्वज्ञानाचे मी पालन करते. मी एवढेच सांगने की, आता तपास चालू आहे. माझा मुंबई पोलिस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. एक कुटुंब म्हणून मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते, विशेषतः एक आई म्हणून माझ्या मुलांसाठी आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. सोबतच मी तुम्हाला आणखी एक विनंती करतो की, सत्य जाणून घेतल्याशिवाय त्यावर टिप्पणी करु नका.'

यापूर्वी, शिल्पाने या प्रकरणाच्या मीडिया रिपोर्टिंगविरोधात उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. तिने 29 मीडिया हाऊसेस आणि पत्रकारांवर खोट्या बातम्या प्रकाशित आणि प्रसारित केल्याचा आरोप करत 25 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...