आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Radhe Release Salman In Profit By Selling Film Ji For 170 Crores, Ji Will Get New Users On The Pretext Of Radhey, Only Cinema Hall In Losses

'राधे'मुळे कुणाला फायदा आणि कुणाला तोटा:170 कोटीत 'झी' ग्रुपला चित्रपट विकून सलमान नफ्यात, झीला 'राधे'च्या निमित्ताने मिळतील नवीन यूजर्स, तोट्यात फक्त चित्रपटगृहे

मनीषा भल्लाएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • आयपीएल रद्द झाल्याने लोकांना या काळात करमणूक हवी आहे, त्यामुळे ब्रँडला जाहिरातीची संधी आहे.

सलमान खानचा 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट केवळ डिजिटल रिलीज ठरेल, हा अंदाज आता खरा ठरला आहे. लॉकडाउनमुळे देशभरातील अनेक भागात थिएटर बंद आहेत, त्यामुळे आता हा चित्रपट केवळ ओटीटी प्लॅटफॉर्म झी-प्लेक्सवर प्रदर्शित झाला आहे. मात्र, ओव्हरसीजमध्ये युएई, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह काही देशांमध्येही हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकला आहे.

बिग बजेट आणि बिग स्टारच्या डिजिटल रिलीजद्वारे नवीन इतिहास लिहित असलेल्या आपल्या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटातून सलमान खानला नफा झाला आहे. झी समूहाने राधेचे सर्व हक्क जास्त किंमतीने विकत घेतले आहेत. या चित्रपटामुळे झी 5 सोबत नवीन यूजर्स जोडले जातील. या चित्रपटामुळे सलमानला जसा आर्थिक फायदा झाला आहे, तसाच भविष्यासाठीचा फायदा झी समूहाला झाला आहे. एकंदरीत या सर्वात जास्त तोट्यात जर कुणी राहिले असतील तर थिएटर मालक आहेत. त्यांच्या हातून अजून एक मोठा चित्रपट निघून गेला आहे.

 • 230 कोटींच्या गुंतवणूकीतून 400 कोटींच्या कमाईची अपेक्षा होती

मूळ योजनेनुसार, हा चित्रपट मे 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर जानेवारी 2021 मध्ये कोरोनाची परिस्थिती सुधारत असल्याची चिन्ह दिसू लागली होती. तेव्हा सलमान खानने झी 5 बरोबर एक करार केला आणि चित्रपटाचे सर्व हक्क त्यांना 230 कोटी रुपयांना विकले.

तेव्हा असा अंदाज वर्तवला गेला की, 13 मे रोजी ईद आहे, तोपर्यंत देशातील परिस्थिती बरीच सुधारली असेल आणि बहुतेक चित्रपटगृहेदेखील सुरू होतील. त्यावेळी झीने या चित्रपटातून 400 कोटी रुपये कमवण्याचा अंदाज बांधला होता, परंतु कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत जेव्हा चित्रपटगृहे सुरु होऊ शकली नाहीत, तेव्हा पुन्हा निगोशिएशन झाले आणि झी समूहाला 170 कोटींत चित्रपटाचे सर्व हक्क मिळाले, अशी चर्चा आहे.

 • हायब्रीड रिलीज (म्हणजे चित्रपटगृहांसह अनेक डिजिटल माध्यमांवर एकाच वेळी चित्रपट प्रदर्शित करणे) ची घोषणा केली गेली, परंतु केवळ डिजिटल रिलीज झाले

गेल्या महिन्यात एप्रिलमध्ये, जेव्हा कोरोनाने पुन्हा आपला पाय पसरले आणि एकापाठोपाठ एक राज्यांमध्ये निर्बंध लागू होऊ लागले, तेव्हा अमिताभ बच्चन यांच्या 'चेहरे' या चित्रपटासह अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच सलमान देखील त्याचा 'राधे' पुढे ढकलणार अशी चर्चा रंगू लागली, पण सलमानला त्याने दिलेला शब्द पाळायचा होता. आणि त्यामुळे त्याने झी समुहासोबत हायब्रीड रिलीजची योजना आखली.

साधारणपणे, कोणताही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर चार आठवड्यांनी ओटीटीवर रिलीज करण्याचा बॉलिवूडमध्ये नियम बनविण्यात आला आहे, परंतु सलमान आणि झीने ही परंपरा मोडित काढत 13 मे रोजी 'राधे' थिएटर आणि ओटीटी अशा दोन्ही माध्यमांवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला, परंतु आता बहुतेक राज्यांमध्ये कोरोना आणि लॉकडाउनमुळे चित्रपटगृह बंद आहेत, त्यामुळे चित्रपट आता केवल ओटीटीवर बघता येणार आहे.

 • सलमानला यामुळे काही चिंता नाही

नव्या करारानुसार झी ग्रुपने सलमानला आधीच 170 कोटी रुपये दिले आहेत, असे ट्रेडशी संबंधित सूत्रांनी सांगितले. या डीलमध्ये सलमान खानला नफाच झाला आहे. होम प्रोडक्शन फिल्म आहे. फक्त सलमान एकटा मोठा स्टार आहे. सलमानची अॅक्शन चित्रपटावर चालते, म्हणून गाणी, सेट्स किंवा इतर गोष्टींवर जास्त खर्च झाला नाही.

 • झीची दुरदृष्टी

देशात 'पे पर व्ह्यू' मॉडेल नवीन आहे, हे झीला माहित आहे. लोकांनी या पद्धतीचा स्वीकार करुन पैसे खर्च करावे, यासाठी अजून वेळ लागणार आहे. पण झीने दुरदृष्टी ठेवत राधेसह धी 5 च्या सबस्क्रिप्शनचा प्लान सामील केला आहे. झीला त्याच्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्राइबर वाढवायचे आहेत. सबस्क्राइबर वाढतील, तरच झी स्वत:च्या अटींनुसार नवीन कंटेंट आणू शकेल आणि नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम आणि हॉट स्टारसमोर तग धरु शकेल. झीचे संपूर्ण लक्ष्य नवीन सबस्क्राइबरवर आहे.

 • अरब देशांमध्ये 700 शो होतील

'राधे'चे यूएईसह अरब देशांमध्ये 700 शो होणार असल्याचे इंडस्ट्रीतील सूत्रांचे म्हणणे आहे. तेथील लोकांनी दीड वर्षांपासून कोणताही हिंदी चित्रपट पाहिला नाही. वरून हा सलमानचा चित्रपट आणि ईदचे निमित्तदेखील आहे.

 • नुकसान केवळ थिएटर मालकांचे

गेल्या दीड वर्षापासून बंद पडलेल्या थिएटरच्या मालकांना 'राधे'कडून मोठी अपेक्षा होती. जेव्हा सलमानने हायब्रीड रिलीजची घोषणा केली तेव्हाच थिएटर मालक नाराज झाले होते. त्यानंतर भारतातील सिनेमा ऑनर्स असोसिएशनचे प्रमुख नितीन दातार यांनी भास्कर यांना सांगितले होते की, राधेनंतर आणखी कोणताही चित्रपट प्रदर्शित होत नाहीत. त्यामुळे कदाचित थिएटर मालक एका चित्रपटासाठी थिएटर उघडतील.

मल्टीप्लेक्स ऑनर्स असोसिएशन ओटीटी रिलीजच्या निर्णयाने फक्त एक दिवस नाराज राहिले. राधेला मल्टिप्लेक्स जागा देणार की नाही, हे त्यांनी अद्यापपर्यंत सांगितले नाही. तसेही, सलमानसारख्या स्टारशी कोणीही आपले संबंध खराब करणार नाहीत. सिंगल स्क्रीनसाठी सलमानचा चित्रपट वरदान दिल्लीच्या डिलाइट सिनेमाचे मालक राजकुमार मल्होत्रा ​​म्हणाले की, जेव्हा जेव्हा आम्ही वितरकाकडून एखादा चित्रपट घेतो, तेव्हा त्यात 50-50 टक्के वाटा असतो. म्हणजेच जे कलेक्शन होईल त्यातील अर्धा वाटा आम्हाला आणि अर्धा वितरकाला मिळतो. नंतर, जर चित्रपट बराच काळ चालला तर आठवड्या-आठवड्यात सिनेमा हॉलला अधिक टक्केवारी मिळते आणि वितरकचा वाटा कमी होत जातो. याचा अर्थ असा की जर एखादा चित्रपट अधिक आठवडे चालला असेल तर सिनेमा हॉलचे उत्पन्न खूप चांगले होते.

संपूर्ण बॉलिवूडमध्ये सलमानचे चित्रपट अधिक कलेक्शन जमा करते. सिंगल स्क्रीनसाठी तर त्याचा चित्रपट जणू वरदानच असतो. सर्वाधिक नफा सलमानचा चित्रपट मिळवून देत असतो. सलमानचा चित्रपट दोन आठवडे जरी चालला तरी सिंगल स्क्रीनसाठी 90 लाख हे मोठे कलेक्शन ठरते. यावरून हे समजून घ्या की सलमानचा चित्रपट हातून जाणे म्हणजे सिंगल स्क्रीनसाठी मोठे नुकसान आहे.

 • आता नफा मिळवणे हे झीचे लक्ष्य

चित्रपट निर्माते आणि व्यापार विश्लेषक गिरीश जोहर म्हणाले की, आता किती नफा कमवावा हे झी 5 वर अवलंबून आहे. यापूर्वी झी 5 ने डिजिटल खरेदी, थिएटर आणि मल्टिप्लेक्सद्वारे नफा कमावतील, असा विचार केला होता. परंतु कोरोनामुळे परिस्थिती बदलली आहे.

याचा एक पैलू म्हणजे सलमान खानचे चाहते बहुतेक छोट्या शहरांमध्ये असतात. त्यांच्याकडे इंटरनेट एक्सेस कसा आहे हा एक मोठा प्रश्न आहे आणि ते कोरोनाशी देखील संघर्ष करीत आहेत. या परिस्थितीत ईदवर त्यांना किती मनोरंजन अपेक्षित आहे हे माहिती नाही.

 • सबस्क्रिप्शन वाढवण्याची झीकडे चांगली संधी

व्यापार विश्लेषक गिरीश वानखेडे म्हणाले की, झी 5 ने व्हिडिओ ऑन डिमांड आणि सबस्क्रिप्शन व्हिडिओ ऑन डिमांड हे दोन्ही मॉडेल एकत्र केले आहेत. झीचा खरा उद्देश सबस्क्रिप्शन वाढविणे हा आहे. येत्या काही दिवसांत ओटीटी माध्यमांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत नेटफ्लिक्स, अमेझॉन आणि हॉट स्टारशी स्पर्धा करण्यासाठी झीकडे चांगला सबस्क्रिप्शन बेस हवा, जो त्यांना राधेमुळे मिळू शकतो. ज्यांना सलमानचा हा चित्रपट बघायचा आहे ते या चित्रपटासह झीचे अॅन्युअल सबस्क्रिप्शनची कॉम्बो ऑफर घेणे पसंत करतील. झीचे हे सूत्र यशस्वी होऊ शकते, कारण सलमानची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. याशिवाय झी 5 ची ओव्हरसीज, डिजिटल आणि सॅटेलाइट राइट्समधून कमाई सुरु राहणार आहे.

 • देशात आयपीएल रद्द झाल्याने चित्रपटाला फायदा होणार

व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी भास्करशी बोलताना सांगितले की, बहुतेक राज्यात चित्रपटगृह बंद आहेत. अशा परिस्थितीत केवळ डिजिटल रिलीज करणे शक्य आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशनने अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत निर्णय जाहीर केलेला नाही. कुठे सिंगल स्क्रीन थिएटर सुरु असतीलही तरी राधेनंतर दुसरा कोणताही मोठा चित्रपट येत नाहीये.

झी ग्रुप ओव्हरसीज रिलीजवर जोर देत आहे. यूएई आणि अमेरिकेत सिनेमा हॉल सुरू झाले आहेत. 17 मेपासून यूकेमध्ये थिएटर सुरु होतील. तेथेही राधे रिलीज होईल. वर्षभरापासून एकही मोठा चित्रपट रिलीज झालेला नाही, त्यामुळे झीला आशा आहे की त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी ठरु शकेल. झीला अन्य डीटीएच प्लॅटफॉर्मवरुनही उत्पन्न मिळेल.

चित्रपटाच्या स्पॉन्सरशिपसाठी बर्‍याच ब्रँडशी चर्चा झाली आहे. आता आयपीएल देखील रद्द करण्यात आले आहे, याचा अर्थ प्रेक्षक देखील मनोरंजन शोधत आहेत आणि ब्रँडला देखील जाहिरात हवी आहे. यासाठी राधे ही सुवर्णसंधी आहे. चित्रपटातील 'सीटी मार' गाण्याला यूट्यूबवर अवघ्या 10 दिवसांत 10 कोटी व्ह्यूज मिळाले असल्याचा दावा केला जातोय. हे बघून झीचा आत्मविश्वासही योग्य वाटतो.

झीजवळ पुढील दहा वर्षांसाठी या चित्रपटाचे हक्क आहेत. झी ग्रुप या राइट्सवर पैसे कमावण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे येणा-या दिवसांत झी चांगला नफा कमावू शकते.

बातम्या आणखी आहेत...