आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुव्ही रिव्ह्यू:सलमानच्या टिपिकल चाहत्यांनाच समर्पित आहे 'राधे : योर मोस्ट वाँटेड भाई'

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट ‘वाँटेड’चा फ्रेंचायजी आहे.
रेटिंग2.5/5
स्टारकास्टसलमान खान, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ आणि दिशा पाटनी
दिग्दर्शकप्रभु देवा
निर्मातासलमान खान, अतुल अग्निहोत्री, सोहेल खान, निखिल नमित
संगीतसचित बल्हारा, साजिद-वाजिद, देवी श्री प्रसाद आणि हिमेश रेशमिया
जॉनरअ‍ॅक्शन ड्रामा
कालावधी108 मिनिटे

सलमान खानचे चित्रपट त्याच्या बळावरच चालतात. निर्मातेदेखील त्याच्या चाहत्यांना पाहून चित्रपट बनवत असतात, चाहत्यांना नक्की आवडेल, असे ते तर्क देत असतात. हा चित्रपट ‘वाँटेड’चा फ्रेंचायजी आहे. 'वाँटेड’ क्लास आणि मास दोघांना आवडला होता. तर ‘राधे’ टिपिकल सलमान खानच्या चाहत्यांनाच समर्पित आहे.

'वाँटेड’ थोडा भावनिक होता तर यात तसे काहीच दिसत नाही. पूर्ण फोकस मुंबईमधून ड्रग्स माफियांना हाकलण्यावर करण्यात आला आहे. त्याचा प्रमुख राणा (रणदीप हुड्डा) असतो. आपल्या गँगच्या दोन गुर्गोंसोबत मिळून तो शाळेतील मुलांनाही ड्रग्सची सवय लावून टाकतो. तो निर्दयी दाखवला. त्याला पकडण्यासाठी एनकाउंटर स्पेशलिस्ट राधेला बोलवण्यात येते. तोदेखील तसाच निर्दयीपणा करत राणाला थांबवतो.

असो, हा एक अ‍ॅक्शन सिनेमा आहे यात कोरिअन फाइट मास्टर मियॉन्ग हेंगे हेओची मदत घेण्यात आली होती. त्यांनी रोमांचक आणि स्लिक स्टंट डिझाइन केले होते. मुंबईच्या अरुंद गल्ल्यात राधे आणि राणाचे अ‍ॅक्शन सीन चांगले वाटतात. राणाचा गुर्गा म्हणून गौतम गुलाटीने प्रभावी काम केले आहे. अ‍ॅक्शनच्या व्यतिरिक्त दिशा पाटणीचे ग्लॅमर रूप दाखवण्यात आले आहे. दियाची भूमिका तिने उत्तमपणे साकारली आहे. राधेचा सीनियर आणि दीयाच्या भावाची भूमिका जॅकी श्रॉफ यांनी साकारली आहे. सिनेमाच्या कथेत सामाजिक काम दाखवण्यात आले आहे. मात्र प्रेक्षकांचे मनोरंजन विसरले. कॅमेरा वर्क आणि कोरिओग्राफीदेखील चांगली आहे. सलमानचे टिपिकल चाहते याला पहिल्यासारखे डोक्यावर घेतील का ? कारण गेल्या दीड वर्षात त्यांनीदेखील ओटीटीवर चांगले कंटेट पाहिले असतीलच.

बातम्या आणखी आहेत...