आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फीचर आर्टिकल:'राधे' मुव्ही रिव्ह्यू :  सलमान खानचा ‘राधे-योर मोस्ट वाँटेड भाई’ हा एक आउट अँड आउट एंटरटेन्मेंट चित्रपट आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • "राधे" एक थ्रिल निर्माण करणारा अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट आहे.

गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून बॉलिवूड अभिनेता सलमान खान वाँटेड (2009), दबंग (2010), बॉडीगार्ड (2011), एक था टाइगर (2012), किक (2014), बजरंगी भाईजान (2015), सुल्तान (2016) आणि भारत (2019) या सारख्या चित्रपटांसह चित्रपटगृहांमध्ये ईदचा आनंद घेऊन आला आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे जग थांबले आणि प्रेक्षकांना चित्रपटगृहांपासून दूर नेले. मात्र काही महिन्यांनी जेव्हा चित्रीकरण पुन्हा सुरु झाले, तेव्हा सलमानने आपल्या चाहत्यांना यंदा तो ईदला त्यांच्या भेटीला येणार असल्याचे वचन दिले. सलमानने आपला दिलेला शब्द पाळला असून 2021 मध्ये राधेच्या रुपात प्रेक्षकांना ईदी दिली आहे. यंदाही कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद आहेत, मात्र सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सलमान मोस्ट वाँटेड भाईच्या रुपात परतला आहे. प्रेक्षक घरबसल्या सलमानचा चित्रपट यंदा बघू शकत आहेत.

प्रभू देवा दिग्दर्शित राधे या चित्रपटात गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी सलमान पोलिस अधिका-याच्या भूमिकेत परतला आहे. वाँटेडच्या 12 वर्षानंतर सलमान यावेळी राणा आणि डगरु भाऊ यांना टक्कर देणार आहे. राणाच्या भूमिकेत रणदीप हूडा तर डगरुच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता प्रवीण तरडे आहे. राणाचे कमांडर, गिरजित आणि लोटा हे साथीदार आहेत. गौतम गुलाटी, भूतानचा अभिनेता संगी शेल्ट्राम यांनी या भूमिका साकारल्या आहेत. तर डगरु भाऊच्या गटात अनेक मराठी कलाकार आहेत.

सलमानचा राधे एक धमाकेदार हिट होण्यासाठी बरीच कारणे आहेत. पहिले म्हणजे सलमान खान त्याच्या ट्रेडमार्क स्वॅगमध्ये दिसतोय. कोरियन अ‍ॅक्शन डायरेक्टर मियाँग हेंग हेओ यांनी दिग्दर्शित केलेले स्टंट सीन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. याशिवाय दिशा पाटनीसोबतचे सलमानचे रोमँटिक सीन्स देखील आहेत. दिशाच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ असून चित्रपटाला कॉमेडीचा तडकादेखील देण्यात आला आहे.

अॅक्शन आणि धमालचे पॅकेज असलेल्या राधेमध्ये ईदची बिर्याणी अधिक चवदार बनवण्यासाठीचे सर्व गुण आहेत. यात काही फुट गँपिंग गाण्यांचाही समावेश आहे. चित्रपटाच्या टायटल ट्रॅक, सलमान-दिशावर चित्रीत झालेले "सीटी मार" आणि "झूम झूम"सह जॅकलिन फर्नांडिसवर चित्रीत झालेले गाणे आणि "दिल दे दिया" चार्टबस्टर हिट ठरले आहेत.

"राधे" एक थ्रिल निर्माण करणारा अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट आहे. 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' सलमान खान फिल्म्सने झी स्टुडिओच्या सहकार्याने सादर केला आहे. सलमा खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित हा चित्रपट यंदा ईदच्या निमित्ताने 13 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. 'पे-पर-व्ह्यू' सेवाअंतर्गत झी प्लेक्सवर हा चित्रपट बघता येणार आहे. झी प्लेक्स डिश, डी 2 एच, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल टीव्ही सारख्या डीटीएच प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...