आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधिकाचा बी टाऊनमधील सुरुवातीचा प्रवास:म्हणाली- मला नाकापासून ते ब्रेस्टपर्यंत, विविध शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी माझ्या शरीराच्या प्रेमात पडले

अभिनेत्री राधिका आपटेने आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राधिकाने तिला चित्रपटसृष्टीत कोणकोणत्या दबावाला सामोरे जावे लागले, याबाबत मोठा खुलासा केला आहे. जेव्हा ती चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी आली होती, तेव्हा इंडस्ट्रीतील लोकांनी तिला अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. काहींनी तिला प्लास्टिक सर्जरी करण्यासही सांगितली होती, असा खुलासा राधिकाने केला आहे.

बोटॉक्सचा सल्ला दिला गेला
इंडस्ट्रीच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना राधिका म्हणाली, "जेव्हा मी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हा माझ्यावर खूप दबाव होता. मला माझ्या शरीरावर आणि चेहऱ्यावर काम करण्यास सांगण्यात आले. माझी पहिली मिटिंग झाली तेव्हा मला नाकावर शस्त्रक्रिया करण्यास सांगितले गेले होते. दुसऱ्या मिटिंगमध्ये मला ब्रेस्टची शस्त्रक्रिया करण्यास सांगण्यात आले. पण हा सल्ला देण्याचा क्रम इथेच संपला नाही, काहींनी मला सांगितले की तू तुझ्या पायावर काहीतरी करायला हवे, तर काहींनी मला बोटॉक्स का करत नाही, असा प्रश्नदेखील विचारला." का मिळत नाही.

माझ्या शरीराच्या प्रेमात पडले
राधिका पुढे म्हणाली, 'माझे केस रंगवायला मला 30 वर्षे लागली आहेत. लोक मला इंजेक्शन आणि प्लास्टिक सर्जरीचा सल्ला देत होते. जेव्हा इंडस्ट्रीतील लोक मला हे सल्ले देत होते, तेव्हा मला त्यांचा राग यायचा. पण हो, या सर्वांच्या सल्ल्याने मी माझ्या शरीराच्या आणि माझ्या चेहऱ्याच्या आणखी प्रेमात पडले,' असे तिने सांगितले.

राधिकाचा वर्कफ्रंट
राधिकाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर तिचा 'फॉरेन्सिक' हा चित्रपट २४ जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विक्रांत मॅसी आणि प्राची देसाई मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय ती हृतिक रोशन स्टारर 'विक्रम वेधा' या चित्रपटातही दिसणार आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...