आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने अलीकडेच 'मिसेस. अंडरकव्हर' या आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. लॉकडाऊन होण्यापूर्वी अभिनेत्रीने कोलकतामध्ये चित्रपटाचे 45 दिवसांचे शेड्युल पूर्ण केले. कोरोना काळातील आरोग्याची गंभीर स्थिती पाहता, चित्रीकरणाचा अनुभव कसा होता, याविषयी राधिकाने सांगितले आहे.
राधिका म्हणाली, "अनुभव काही वेगळा नव्हता, आम्ही वारंवार कोरोना चाचण्या करत होतो. आम्ही सगळेच जण तिथे बरीच सावधगिरी बाळगत होतो आणि आरोग्य व सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करत होतो. त्याशिवाय इतर सर्व काही अगदी सारखेच होते."
शूटिंग दरम्यान अभिनेत्रीने सर्व आवश्यक ती सावधगिरी बाळगली. हॉटेलपासून लोकेशनपर्यंत फक्त तेवढाच आवश्यक प्रवास करण्यात आला असून चित्रिकरणाशी संबंधित नसलेल्या सर्व गोष्टी पूर्णपणे रद्द केल्या गेल्या होत्या.
ही ओटीटी क्वीन सध्या यशाच्या शिखरावर असून तिच्याकडे अनेक मुख्य मासिकांची मुखपृष्ठे आहेत. तसेच, 'ओके कॉम्प्यूटर' या वेब सीरिजमध्ये तिच्या अभिनयाबद्दल कौतुक झाल्यानंतर राधिका भविष्यात लवकरच काही प्रमुख चित्रपटांमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ‘मिसेस अंडरकव्हर’ आणि काही टाइटल न ठरलेल्या प्रोजेक्टचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.