आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांच्या प्रेमप्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा रंगली आहे. अद्याप दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही. पण दोघे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसत आहेत. बुधवारी हे दोघे मुंबईहून दिल्लीला पोहोचले. त्याचे कारण म्हणजे येत्या 13 मे रोजी दोघांचा साखरपुडा दिल्लीला होणार आहे. दोघांच्याही घरी लगीनघाईला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे.
लग्नाला बोलावणार का?
दरम्यान, मंगळवारी दिल्ली एअरपोर्टवर परिणीती आणि राघव यांना पापाराझींनी घेरले होते. या दोघांना पाहिल्यावर पापाराझींनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. अनेकांनी "लग्नाला आम्हाला बोलवणार का?" असा प्रश्न दोघांना विचारला. यावर परिणीतीने दरवेळीप्रमाणे ‘थँक यू’ म्हणत एअरपोर्टवरुन काढता पाय घेतला. तसेच काही फोटोग्राफर्सनी "वहिनी-वहिनी" म्हणत अभिनंदन केल्यावर राघव चड्ढा हसत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. सध्या या दोघांचा एअरपोर्टवरील हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
साखरपुड्याला 150 पाहुण्यांना निमंत्रण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा येत्या शनिवारी नवी दिल्लीत साखरपुडा होणार असल्याचे बोलले जात आहे. त्या दोघांच्या साखरपुड्याला फक्त 150 मंडळी हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण परिणीती चोप्रा किंवा राघव चड्ढा यांच्याकडून साखरपुड्याच्या बातमीला दुजोरा मिळालेला नाही.
गेल्याच महिन्यात होणार होता साखरपुडा
खरं तर गेल्याच महिन्यात 10 एप्रिल रोजी दोघे साखरपुडा करणार असल्याची चर्चा होती. पण गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीच्या आरोपपत्रात राघव यांचे नाव आल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, आरोपपत्रात राघव यांचे नाव आरोपी म्हणून नाहीये. ईडीने त्याला केवळ चौकशीसाठी बोलावले होते. आता 13 मे रोजी दिल्लीत दोघे ऑफिशिअली एंगेज्ड होणार असल्याचे म्हटले जात आहे.
लंच डेटवर एकत्र दिसल्यानंतर डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राघव आणि परिणीती गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही एकमेकांना पसंत करतात आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या नात्याला समंती दर्शवली आहे. गेल्या महिन्यात मुंबईत लंच डेटवर एकत्र दिसल्यानंतर दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले होते
काही दिवसांपूर्वीच राघव-परिणिती आयपीएल 2023 चा सामना पाहण्यासाठी मोहाली स्टेडियमवर एकत्र पोहोचले होते. यावेळी दोघांची खास बाँडिंग पाहायला मिळाली. यावेळी परिणीतीला स्टेडियममध्ये पाहून चाहत्यांनी 'परिणीती वहिनी झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या.
ऑक्टोबरमध्ये लग्नागाठीत अडकू शकतात दोघे
रिपोर्ट्सनुसार, लग्नाची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस दोघे लग्नाच्या बंधनात अडकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.