आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा 13 मे रोजी साखरपुडा झाला. दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये हा शाही सोहळा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याचा एक इनसाइड व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये राघव-परिणिती एंगेजमेंट फंक्शनमध्ये केक कापताना दिसत आहेत. या सोहळ्यात त्यांनी एकत्र डान्सही केला.
केक कापल्यानंतर डान्स केला
या व्हिडिओत परिणीतीच्या 'केसरिया' या चित्रपटातील 'वे माही' हे गाणे बॅकग्राऊंडला वाजताना दिसत आहे. परिणीती देखील या गाण्यावर लिपसिंक करताना दिसत आहे. परिणीती हे गाणे गात असताना राघव तिला गालावर किस करताना दिसत आहे. राघवच्या या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
एंगेजमेंटसाठी परिणीतीने पेस्टल क्रीम कलरचा डिझायनर सूट परिधान केला होता. तिने आपले केस मोकळे ठेवले होते आणि त्यावर साजेसा सिंपल मेकअप केला होता. तर राघव ऑफ व्हाइट कुर्ता-पँटमध्ये दिसले.
व्हाईट-पेस्टल थीमवर सजावट करण्यात आली होती
व्हिडिओमध्ये कपलच्या एंगेजमेंट व्हेन्यूची सजावटही दिसत आहे. व्हाईट आणि पेस्टल क्रीम कलरवर कार्यक्रमस्थळाची सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी एकाच रंगाची फुले वापरण्यात आली होती.
यूजर्स म्हणाले - दोघांची जोडी छान दिसतेय
सोशल मीडियावर यूजर्स परिणीती आणि राघव यांच्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, 'राघव-परिणीती एकत्र छान दिसत आहेत, दोघे नेहमी आनंदात राहो.'
आणखी एका यूजरने लिहिले, 'राघव लाजाळू आहे, परी चुलबुली आहे. दोघांची जोडी छान दिसतेय.'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.