आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या आप नेते राघव चड्ढा यांच्यासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दोघे दिल्लीत साखरपुडा करणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान परिणीतीची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. त्या मुलाखतीत अभिनेत्रीने राजकारणाशी संबंधित व्यक्तीशी लग्न करणार नसल्याचे म्हटले होते.
आता व्हायरल होत असलेल्या मुलाखतीत परिणीती म्हणाली होती की, तिला एक चांगली विनोदबुद्धी असलेली आणि तिचा आदर करणारी व्यक्ती जोडीदाराच्या रुपात हवी आहे. खरं तर एकेकाळी परिणीतीने राजकारणातील व्यक्ती आवडत नसल्याचे म्हटले असले तरी आता मात्र ती राजकारणी राघव चड्ढांच्या प्रेमात पडली हेच सत्य आहे.
राजकारण्याशी लग्न करण्यास दिला होता नकार
फरीदून शहरयार यांनी घेतलेली परिणीती चोप्राची जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. त्या मुलाखतीत तिला कोणत्या क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करायला आवडेल, राजकारणी व्यक्ती आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना परिणीती म्हणाली होती की, 'मी राजकारणाशी संबंधित व्यक्शी लग्न करणार नाही, माझ्याकडे पर्यायांची कमतरता नाही.'
तिने बॉलिवूडमधील आवडत्या अभिनेत्याचे नाव घेताना सैफ अली खानच्या नावाचा उल्लेख केला होता. तर हॉलीवूडमधून अभिनेता ब्रॅडली कूपर आवडत असल्याचे सांगितले होते. क्रिडा क्षेत्रातून तिने टेनिस दिग्गज रॉजर फेडररचे नाव घेतले होते. परिणीतीने या मुलाखतीत तिला प्रवासाची आवड असल्याचेही सांगितले होते.
परिणीतीचे वडील म्हणाले - काहीही बोलणे खूप घाई आहे
दरम्यान परिणीती चोप्रा हिचे वडील पवन चोप्रा यांनी दोघांच्या नात्यावर भाष्य केले होते. पवन चोप्रा म्हणाले, ‘आता त्यांच्या नात्यावर बोलणे योग्य ठरणार नाही…’ एवढेच नाही तर, अभिनेत्रीच्या आईने लेकीच्या नात्याबद्दल मौन बाळगले आहे.
पंजाबमध्ये पहिल्यांदा भेटले दोघे
ई टाझम्सच्या वृत्तानुसार, परिणीती आणि राघव चढ्ढा पंजाबमध्ये पहिल्यांदा भेटले होते. हे दोघे किती दिवसांपासून नात्यात आहेत, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. परंतु असे म्हटले जाते की, दोघेही जवळपास मागील सहा महिन्यांपासून एकत्र आहेत. राघव हे पंजाबमधील भगवंत मान सरकारचे मुख्य सल्लागार आहेत.
निकटवर्तीयांनी दिल्या दोघांना शुभेच्छा
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी अद्याप त्यांचे नाते अधिकृत केलेले नाही. परंतु त्यांच्या निकटवर्तीयांनी दोघांना शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. परिणीतीचा खास मित्र हार्डी संधूनेही या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.
तो म्हणाला की, "मी परिणीतीसाठी खूप आनंदी आहे, मी तिला शुभेच्छा देतो. मी तिचे फोनवर अभिनंदनही केले आहे." त्याने सांगितले की, "कोड नेम तिरंगा या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान परिणीती आणि माझ्यात लग्नाबद्दल चर्चा झाली होती. तेव्हा ती नेहमी म्हणायची की, जेव्हा मला वाटेल की मला योग्य व्यक्ती सापडली आहे तेव्हाच मी लग्न करेल."
तसेच आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोरा यांनीही ट्वीट करत दोघांचे अभिनंदन केले होते. ते म्हणाले होते, 'मी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही आनंदी राहा. तुम्हाला शुभेच्छा.'
यापूर्वी परिणीतीचे नाव दिग्दर्शक मनीष शर्मासोबत जोडले गेले
राघव चढ्ढा यांच्यापूर्वी परिणीतीचे नाव दिग्दर्शक मनीष शर्मासोबत जोडले गेले होते. मनीष हा शाहरुख खानचा 'फॅन', परिणीतीचा पहिला चित्रपट 'लेडीज वर्सेस रिकी बहल' आणि 'शुद्ध देसी रोमान्स' यांसारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ओळखला जातो. रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि मनीषला वेगळे होऊन एक वर्ष झाले आहे.
परिणीती आणि राघव चड्ढा यांना गेल्या काही दिवसांपासून अनेकदा एकत्र स्पॉट केले गेले. दरम्यान आता लवकरच दोघांचा साखरपुडा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दोघे साखरपुडा करणार असल्याचे म्हटले जात आहे. हा सोहळा अतिशय खासगी ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे वाचा संपूर्ण वृत्त...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.